महापौरांच्या निर्णयामुळे दिलासा
नाशिक : प्रतिनिधी
प्रशासकीय राजवटीत प्रशासनाने विविध विभागांकडून राबवल्या जाणार्या निविदांसाठी स्वतंत्र टेंडर सेल कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. या विभागाची सूत्रे महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता महुआ बॅनर्जी यांच्याकडे सोपवली होती. दरम्यान, जेव्हापासून या विभागाची स्थापना झाली तेव्हापासून टेंडर (निविदा) प्रक्रिया कमालीची मंदावली होती. तब्बल सात ते आठ महिने टेंडर रखडत असल्याने याचा फटका पालिकेच्या कामांवर होत होता. याप्रकरणी नगरसेवकांनी टेंडर सेलच्या निष्क्रियतेवर आरोप केल्यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी हा टेंडर सेल रद्द करत प्रशासनाला दणका दिला.
महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर प्रशासनाने घेतलेले काही निर्णय रद्द केले जात आहेत. टेंडर सेलकडे बांधकाम, उद्यान, आरोग्य, घनकचरा आदींसह विविध विभागांकडून निविदा मंजूर करण्यासाठी प्रक्रिया राबवली जात होती. परंतु, या विभागातील कामकाज अत्यंत संथगतीने होत असल्याने अधिकारी अक्षरश: या विभागाच्या कारभाराला वैतागले होते. शनिवारी झालेल्या विशेष महासभेत नगरसेवकांनी या सेलवरील संताप व्यक्त करत तो रद्द करण्याची मागणी केली. निविदा प्रक्रिया 120 दिवसांत राबवणे गरजेचे असताना सात ते आठ महिने निविदेवर कार्यवाही होत नसल्याचे चित्र होते. स्मार्ट पार्किंगच्या टेंडरची प्रक्रिया वर्षभरापासून सुरू असून, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने परिणामी अद्यापपर्यंत स्मार्ट पार्किंग निविदेच्या कचाट्यात अडकली आहे. दरम्यान, महापौरांनी टेंडर सेल रद्द केल्यानंतर या निर्णयाचे अधिकार्यांसह नगरसेवकांनीदेखील स्वागत केले आहे.
The way will be cleared for the tender.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik