नाशिक

नाशिकमध्ये रस्ता खोदकामाचा आणखी एक बळी

प्रसिद्ध उद्योजक हेमंत राठी यांचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरभरात स्मार्ट सिटी आणि विविध विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या संथ, नियोजनशून्य खोदकामाचा आणि वाहतूक शाखेच्या ढिम्म कारभाराचा फटका पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाला
बसला आहे.
कॅनडा कॉर्नर येथील प्रसिद्ध टेलिकॉम व्यावसायिक हेमंत चंद्रनारायण राठी (वय 65) हे भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी होऊन ब्रेनडेड झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असून, या घटनेमुळे नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये हेमंत राठी यांचे इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमचे दुकान आहे. दुकानासमोरील रस्ता महापालिकेच्या संथ खोदकामामुळे पूर्णपणे उखडला गेला आहे. पार्किंगला पुरेशी जागा नसल्याने त्यांनी मंगळवारी (दि. 29) आपली कार पलीकडच्या पाटील लेनमध्ये पार्क केली होती. गाडी आणण्यासाठी राठी रस्ता ओलांडत असतानाच, एका भरधाव वेगाने आलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, राठी हे रस्त्यावर आदळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी अल्पवयीन दुचाकीस्वाराला पकडले. अपघात घडताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला परिसरातील व्यापार्‍यांनी व नागरिकांनी तात्काळ पकडले. तेथे तैनात असलेल्या एका वाहतूक पोलिसाने रिक्षा थांबवून बेशुद्धावस्थेतील राठी यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
तपासणीदरम्यान राठी यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव होऊन रक्ताची गाठ तयार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना नाशिकमधील दुसर्‍या नामांकित रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली; मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना वाचवण्यात यश आले नाही आणि डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. हेमंत राठी यांच्या अपघाताची माहिती मिळताच परदेशात आणि इतर राज्यांत असलेले त्यांचे मुलगा, मुलगी आणि जवळचे नातेवाईक नाशिकमध्ये दाखल झाले. या कठीण आणि दुःखाच्या प्रसंगी डॉक्टरांनी अवयवदानाची जाणीव करून दिली असता, राठी कुटुंबीयांनी अत्यंत संवेदनशील निर्णय घेत अवयवदानास संमती दिली होती. मात्र, वैद्यकीय व तत्सम तांत्रिक कारणांमुळे हे अवयवदान टळले. शनिवारी त्यांच्यावर पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार
करण्यात आले.
मुख्य रस्त्यांचे खोदकाम करून महिनान्महिना ते अर्धवट सोडले जाते. सुरक्षेचे बॅरिकेट्स, रेडियमचे इशारे किंवा पर्यायी पार्किंगची कोणतीही योग्य व्यवस्था केली जात नाही. शहरात परवाना नसताना भरधाव वेगाने स्टंट करत गाड्या चालवणार्‍या अल्पवयीन मुलांची संख्या वाढली आहे.
अशा निष्काळजी प्रशासनावर आणि अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या सोपवणार्‍या पालकांवर कडक गुन्हे दाखल होणार का, असा संतप्त सवाल आता नाशिककर नागरिक विचारत आहेत.

Another victim of road excavation work in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago