‘ड्रोन कुणाचे?’ चांदवड तालुक्यात नागरिकांमध्ये संभ्रम
चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अंधारात गावांच्या परिसरात अचानक दिसणार्या या ड्रोनमुळे कुतूहलासोबतच सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे ड्रोन नेमके कुणाचे, कोणत्या उद्देशाने उडविले जात आहेत आणि त्यासाठी प्रशासनाची परवानगी आहे का, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
दरेगाव परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने तातडीने धाव घेतली. सुमारे 50 ग्रामस्थांना सोबत घेऊन पोलिसांनी ड्रोनचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ड्रोन खूप उंचावर असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नाही. रात्री दहा वाजेनंतर ड्रोन दिसणे बंद झाल्याने ही शोधमोहीम तूर्तास निष्फळ ठरली. पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी या प्रकाराची दखल घेत पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले आहे.
संबंधित ड्रोन शासकीय किंवा अधिकृत कामासाठी असल्यास त्याची पूर्वकल्पना स्थानिक प्रशासन व पोलिसांना असणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय विनाकारण ड्रोन उडविले जात असल्यास, त्यामागील व्यक्ती किंवा संस्थांचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी.
अफवांना बळी न पडता नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच प्रशासनानेही तातडीने अधिकृत खुलासा करून संभ्रम दूर करावा, अशी जोरदार मागणी चांदवड तालुक्यातून होत आहे. रात्रीच्या आकाशात घिरट्या घालणार्या या गूढ ड्रोनमागचे सत्य काय, याचे उत्तर मिळण्याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर तर्क-वितर्क
ड्रोनच्या हालचालींचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यामुळे ‘ड्रोन कुणाचे?’, ‘रात्रीच का फिरत आहेत?’, ‘कोणते सर्वेक्षण सुरू आहे का?’ अशा विविध चर्चांना उधाण आले आहे. अधिकृत माहिती नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
Mysterious circling of drones in the night sky.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…