नाशिक

गोजरे मळ्यात पहाटे बिबट्या जेरबंद!

कालवडीचा फडशा पाडणारा साडेचार वर्षांचा नर बिबट्या पिंजर्‍यात

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराच्या पश्चिमेला असलेल्या मातोश्री गोजरे मळा परिसरात गेल्या आठवड्यापासून दहशत निर्माण करणारा नर बिबट्या रविवारी (दि. 4) पहाटे पाचच्या सुमारास अखेर वनविभागाच्या पिंजर्‍यात जेरबंद झाला.
बिबट्या पकडल्याचे समजताच वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला सुरक्षितपणे मोहदरी येथील वनोद्यानात हलविले. बिबट्या जेरबंद झाल्याने गोजरे मळ्यासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पकडलेला नर बिबट्या अंदाजे साडेचार वर्षे वयाचा आहे.
गेल्या आठवड्यात दत्ता गोजरे यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने कालवडीचा फडशा पाडला होता. त्यानंतर वृंदावननगर, वीर सावरकरनगर आणि प्रकाशनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद कोबरणे आणि दत्ता गोजरे यांनी वनविभागाला माहिती देत तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ यांच्यासह कर्मचार्‍यांनी 25 सप्टेंबर रोजी गोजरे मळा परिसरात पिंजरा लावला. बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजर्‍यात कोंबडी ठेवण्यात आली होती. अखेर रविवारी पहाटे बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याने वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले.
बिबट्या पिंजर्‍यात अडकल्यानंतर त्याच्या डरकाळ्यांनी पहाटे परिसर दणाणून गेला. माहिती मिळताच वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक संतोष चव्हाण, निखिल वैद्य आणि आकाश रूपवते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेत मोहदरी येथील वनोद्यानात हलविले.

वीर सावरकरनगरातही कुत्र्याच्या पिलाची शिकार

जेरबंद झालेल्या बिबट्याने काही दिवसांपूर्वी वीर सावरकरनगरातील एका बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आवारात प्रवेश केला होता. तेथे त्याने कुत्र्याच्या पिलाची शिकार केली होती. शहरालगतच्या नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

Leopard captured at dawn in Gojare Mala!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago