format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0763,0.0000; brp_del_sen:0.3000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.028571429, 0.35741055);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 155.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 45;
शहरात रामनवमीचा अपूर्व उत्साह
नाशिक : प्रतिनिधी
चैत्र शुद्ध नवमीचा दिवस… आनंदाला भरतं आलेले… अन् दुपारी बरोबर बाराच्या ठोक्याला भाविकांच्या अपूर्व उत्साहात ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ म्हणत भाविकांनी प्रभू श्रीरामाचा जयघोष करत रामनवमीचा उत्सव साजरा केला.
शहरातील ऐतिहासिक काळाराम मंदिरात श्री प्रभू रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे मंदिराचे वंशपंरपरागत पुजारी प्रणव पुजारी व आशितोष पुजारी यांनी यथासांग पूजा केली. महंत सुधीरदास महाराज यांनी पौरोहित्य केले. यावेळी अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. काकड आरती राघवेंद्र पुजारी यांनी केली. मुख्य पूजा नरेंद्र बुवा यांनी केली. संध्याकाळची शयन आरती चंद्रशेखर बुवा पुजारी यांनी केली.रामनवमीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रीघ लावली होती. ‘जय श्रीराम’च्या नार्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्याचप्रमाणे राजकीय मंडळींनीही काळाराम मंदिरात जात श्री प्रभू रामाचा आशीर्वाद घेतला.
महाप्रसाद व सरबताचे वाटप
रामनवमीच्या निमित्ताने शहरातील विविध राममंदिरांत धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्ष व संस्थांकडून सरबत व पाण्याचे वाटप रामभक्तांना करण्यात येत होते.
मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची मांदियाळी
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.
श्रीरामाला अन्नकोट महानैवेद्य
श्री काळाराम मंदिरात दरवर्षी रामनवमीला श्रीरामाासाठी अन्नकोट महानैवेद्य तयार करण्यात येतो. अडीचशे ताटांच्या मिष्टान्नाचा नैवेद्य श्री प्रभू रामाला अर्पण करण्यात आला. यात विविध मिठाईसह विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.
विविध मंदिरांत ‘जय श्रीराम’चा गजर
तपोवनातील कपिला संगम येथील श्रीराम पर्णकुटी मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मुठे गल्लीतील गोरेराम मंदिरात मुठे परिवारातर्फे पूजा व अभिषेक करण्यात आला. सीतागुंफा येथील गोरेराम मंदिर, रामकुंडाजवळील अहिल्याराम मंदिरात पूजा व अभिषेक करण्यात आला. जिल्हा न्यायालय आवारात असलेल्या हनुमान मंदिरात श्री मारुती मंदिर पब्लिक ट्रस्टतर्फे रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Ram was born, my friend.. Ram was born…
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…