पंचवटीतील शिक्षकाला गॅस बिलाच्या नावे गंडा
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात सायबर भामट्यांचा सुळसुळाट झाला असतानाच आता गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने एका शिक्षकाची तब्बल 4 लाख 85 हजार 998 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीविरुद्ध फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी परिसरातील देवेंद्र हाइटमध्ये राहणारे शिक्षक अनिल पुंजाराम शेवाळे (वय 56) यांना 26 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एक कॉल आणि मेसेज आला. तुमचे 5,905 रुपयांचे गॅस बिल थकीत आहे. ते भरा, अन्यथा पुरवठा खंडित होईल, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांना ’चछॠङ ॠरी इळश्रश्र णविरींश’ नावाची एक लिंक पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.
लिंक डाउनलोड करताच खाते रिकामे
फिर्यादी शेवाळे यांनी विश्वास ठेवून संबंधित लिंक डाउनलोड केली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळवत, त्यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने 4 लाख 85 हजार 998 रुपये लंपास केले. खात्यातून पैसे वळते झाल्याचे मेसेज आल्यानंतर आपल्याला गंडा घातल्याचे शेवाळे यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर अनिल शेवाळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पवार यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
As soon as the MNGL link came, Rs. 4.75 lakh disappeared!
खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…
खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…
शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…
सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…
कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…