नाशिक

जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाणीस्रोत तपासणीला सुरुवात

हलगर्जीपणा करणार्‍या ग्रामपंचायतींना लाल कार्ड

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा आणि पावसाळ्यात उदभवणार्‍या जलजन्य आजारांना व साथीच्या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सन 2026 मधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे मॉन्सूनपूर्व स्वच्छता सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेंतर्गत कामात हलगर्जी करणार्‍या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देऊन धोक्याचा इशारा दिला जाणार आहे.

मॉन्सूनपूर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण 1 ते 30 एप्रिलदरम्यान प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व नवीन नियुक्त आरोग्यसेवकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत पाणी गुणवत्ता व स्रोत सर्वेक्षण या विषयावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रदीप निकम, आरोग्य सहाय्यक सुरेश जाधव यांनी सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना पाणी गुणवत्ता व स्रोत सर्वेक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.
या मोहिमेत तालुक्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत, नळपाणी पुरवठा योजना, तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांच्या स्वतंत्र पाणीस्रोतांचेही सर्वेक्षण अनिवार्य करण्यात आले आहे.
हे सर्वेक्षण आरोग्यसेवक, जलसुरक्षक आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाद्वारे केले जाईल. यात महिला सदस्यांचा सहभाग प्रामुख्याने घेतला जाणार आहे.
सर्वेक्षणाचे जिओ-टॅग फोटो काढणे अनिवार्य आहे. सर्वेक्षणाची सर्व माहिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदवली जाईल.
अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली जाईल. लाल व पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना तांत्रिक त्रुटी दूर करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाईल. कामात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाईचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिला आहे.
याच कालावधीत राज्य शासनाचे माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव हे अभियानदेखील 1 एप्रिल 2026 पासून सुरू होत आहे. उत्कृष्ट काम करणार्‍या ग्रामपंचायतींना जिल्हा ते राज्यस्तरावर 25 लाखांपासून पाच कोटींपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.

आमचे मुख्य उद्दिष्ट शून्य साथरोग हे आहे. ग्रामपंचायतींनी टीसीएल पावडरचा पुरेसा साठा ठेवावा आणि पाणी शुद्धीकरणाकडे विशेष लक्ष द्यावे. कामात हलगर्जी करणार्‍यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल.
– दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
पाणी व स्वच्छता, जिल्हा परिषद, नाशिक

सर्वेक्षणाचे वेळापत्रक आणि व्याप्ती शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, हे
सर्वेक्षण वर्षातून दोन टप्प्यांत राबवले जाते.

पहिला टप्पा (मॉन्सूनपूर्व)
1 ते 30 एप्रिल 2026.
दुसरा टप्पा (मॉन्सनोत्तर)
1 ते 31 ऑक्टोबर 2026

 

 

Pre-monsoon water source inspection begins in the district

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

11 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

11 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

11 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

11 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

11 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

11 hours ago