व्यावसायिकांमध्ये चिंता; सुदैवाने रक्कम चोरण्यास अपयश
मौजे सुकेणे : प्रतिनिधी
कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील बसथांब्याजवळील स्वर्गीय माधवराव पहिलवान जाधव पतसंस्थेसमोर असलेले इंडिया कंपनीचे एटीएम चोरट्यांनी शुक्रवारी (दि. 6) पहाटे तीन ते चारच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न केला. लोखंडी टॉमी व सळईच्या सहाय्याने या एटीएमची तोडफोड केली. सुदैवाने एटीएमचा आतील भाग भक्कम असल्याने रक्कम चोरण्यात चोरट्यांना अपयश आले. सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती आत व एक व्यक्ती बाहेर बाहेर दिसत असून, त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्यानेे ते स्पष्ट दिसत नाहीत. मात्र, पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.
भरवस्तीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानेे आजूबाजूचे गाळेधारक, व्यावसायिक, टपरीधारकांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही अनेक दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून व शटर वाकवून चोर्या करण्याचा प्रयत्न झाला आहे.
दरम्यान, एटीएम फोडण्यात आल्याचे वृत्त कळताच ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कंडारे, उपनिरीक्षक डोळस, सैंदाणे, जाधव, हवालदार मदने, बैरागी, गांगुर्डे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असून, संबंधितांना लवकरात लवकर बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास पोलीस अधिकार्यांकडून व्यक्त झाला. पोलिसांनी बसस्थांबा परिसरात गस्त घालावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून
होत आहे.
पतसंस्थेसमोर असलेल्या इंडिया कंपनीच्या एटीएमची तोडफोड करण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यापूर्वीदेखील या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांनी या भागात गस्त घालणे गरजेचे आहे. – बाळासाहेब जाधव, चेअरमन, माधवराव जाधव पतसंस्था, कसबे सुकेणे
ATM near bus stand in Kasbe Sukene vandalized
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…