मुंबई :
सध्या राज्यभरात तुकाराम मुंढे यांचा अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए ) कारवाई करत आहे. राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे. पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी ही बंदी असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
यावेळी सावजी जेवणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सांगितले की, माझे वक्तव्य नीट ऐका, ते व्यक्तिगत होते. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असेही
मुंढेंनी स्पष्ट केले. तुकाराम मुंढे म्हणाले, माझे वक्तव्य पुन्हा ऐकावे, ते जर खाल्ले तर 1 महिना मी आजारी पडेन, असे माझे वक्तव्य होते. दुसरे आजारी पडतील असे म्हटलेले नाही, कुणी खा किंवा नका खाऊ असे म्हटलेले नाही, असे स्पष्टीकरण तुकाराम मुंढेंनी दिले. सन 2008-09 मला एका मित्राने ओढून नेले होते, बघूनच मला ते जास्त लाल दिसले होते. त्यावेळी एक घास खाल्ला आणि मी उठलो. कारण, मला ते तेलकट, तिखट वाटले. मात्र, मी कुणी खाऊ नये, असे म्हटले नाही.
संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लॅबमधील लोकांना सुट्टी मिळत नाही, यासंदर्भात मुंढेंना विचारण्यात आले. लॅब 24 तास चालते. याचा अर्थ असा नाही की कर्मचार्यांनी 24 तास काम करायचे. दररोज आठ तास, आठवड्याला 48 तास काम करणे अपेक्षित आहे. एक दिवस साप्ताहिक सुट्टी असते. 10 ते 6 हीच वेळ कामाची असेदेखील होऊ शकत नाही, त्यांचे गैरसमज दूर होतील, असे तुकाराम मुंढे म्हणाले.
Ban on analogue paneer for one year: Tukaram Mundhe
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…