एसआयटीची स्थापना : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने ‘आयुष्यमान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांमधील वाढत्या गैरप्रकारांची गंभीर दखल घेत एका विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 10 जुलै रोजी विधानभवनात पार पडलेल्या बैठकीत आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेण्यात
आला.
या बैठकीत भाजपचे आमदार राहुल आहेर यांनी नाशिक जिल्ह्यात महात्मा जोेतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहाराची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा
केली होती.
जुलै 2024 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत राज्यभरातून पोर्टलवर दाखल झालेल्या तब्बल 15,407 संशयास्पद वैद्यकीय दाव्यांची सखोल चौकशी या पथकामार्फत केली जाणार आहे. एकाच मोबाइल क्रमांकाचा वापर करून अनेक रुग्णांची नोंदणी करणे, चुकीची माहिती भरणे आणि एका वर्षात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे वारंवार दाखल होणे, अशा अनेक तक्रारी समोर आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, काही रुग्णालयांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत व्यक्तींच्या नावावरही उपचाराचे दावे दाखल करून पैसे लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच तपासाचा एक भाग म्हणून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेवरून नुकताच नाशिकमधील तीन खासगी रुग्णालयांच्या (शिव मल्टिस्पेशालिटी, क्रिटिकेअर आणि ग्रेस हॉस्पिटल) संस्थापकांवर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयांनी 361 बोगस दाव्यांच्या माध्यमातून तब्बल 1.79 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
संचालक रडारवर येण्याची दाट शक्यता
शासकीय आरोग्य योजनांचा लाभ खर्या आणि गरजू रुग्णांपर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी राज्य सरकारने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य अधिकार्यांना या 15 हजारांहून अधिक संशयास्पद दाव्यांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्यायसंहितेच्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या विविध कलमांखाली सध्या गुन्हे दाखल केले जात असून, या एसआयटी चौकशीअंती राज्यातील आणखी काही बोगस रुग्णालये आणि त्यांचे संचालक रडारवर येण्याची दाट शक्यता आहे.
Inquiry into irregularities in the Ayushman Bharat and Mahatma Phule Jan Arogya Yojana.
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…