ओझरमध्ये बाणगंगा नदीला दुसरा पूर

ओझर : वार्ताहर
ओझर आणि ओझर टाउनशिपसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सर्वदूर झालेल्या या पावसामुळे बाणगंगा नदीला मोसमातील दुसरा पूर आला असून, मारुती वेस येथील पुलाला पाणी टेकले आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला हा पाऊस काल दिवसभर आणि रात्रभर थांबून-थांबून कोसळत होता. काल गुरुवारीदेखील पावसाने थोडी विश्रांती घेत आपली संततधार कायम ठेवली आहे.
बाणगंगा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर ओझर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी, अभियंता आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर उतरून पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Banganga river floods again in Ozar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *