नाशिक

सप्तशृंगी मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला

उल्हासनगरचा संशयित तरुण पंचवटीत जेरबंद

सिडको : प्रतिनिधी
पंचवटीतील सीतागुंफा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सप्तशृंगी माता मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पंचवटी पोलिसांनी छडा लावला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी विशाल कन्हैयालाल खत्री (29, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला रामकुंड परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सप्तशृंगी माता मंदिरातून 7 सप्टेंबर रोजी चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीस गेलेल्या मुकुटाचा शोध घेण्यासाठी पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही
फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.
दरम्यान, संबंधित व्यक्ती रामकुंड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस शिपाई घाडगे आणि आगोणे यांनी रामकुंड परिसरात सापळा रचला. तेथे संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीचे वर्णन आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताचे वर्णन जुळत असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, विशाल खत्री याने मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्याच्याकडून सुमारे 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ तसेच कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, अमोल काळे, लोणारे, घाडगे, चारोरकर, जगताप, गायकवाड, वायकंडे, चितळकर, बहिकर, आगोणे, देशमुख, जाधव, पाटील, पवार, अंकुश काळे, परदेशी आणि रोहिणी भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे करीत आहेत.

Silver crown stolen from Saptashrungi temple.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago