आता कारवाईचा भोंगा वाजणार

आता कारवाईचा भोंगा वाजणार
नाशिक: प्रतिनिधी
मशिदीपासून शंभर मीटर च्या आत हनुमान चालीसा म्हणता येणार नाही असे आदेश काल काढल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आज आणखी एक आदेश काढले आहेत. भोंग्याचा आवाजाची पातळी किती डेसीबल आहे हे आता मोजण्यात येणार आहे, न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिब्लपेक्षा जास्त आढळून आल्यास कारवाई चा बडगा उगरण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस यांची एक टीम तयार करण्यात येईल,

लाऊडस्पीकरसाठी आता परवानगी आवश्यक

भोंग्या साठी परवानगी आवश्यक असून परवानगी न घेता भोंगा लावलेला असल्यास कारवाई करण्यात येईल,. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या अलटीमेंटम नंतर सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कालच आयुक्तांनी हनुमान चालीसा म्हणण्यासाठी परवानगी घेण्याचे आदेश काढले होते. आता आज नव्याने आदेश काढत भोंग्याच्या आवाजाची पातळी मोजण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामुळे पोलीस आयुक्त पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

ध्वनी क्षेपकासाठी आवाज मर्यादा 
औद्योगिक क्षेत्र रात्री ७० डेसिबल व दिवसा ७५ डेसिबल
व्यावसायिक क्षेत्र व वाणिज्य क्षेत्र रात्री ५५ डेसिबल,दिवसा ६५ डेसिबल
निवासी क्षेत्र रात्री ४५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल
शांतता परिक्षेत्रात रात्री ४० डेसिबल व दिवसा ५० डेसिबल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *