नाशिक

‘सियावर रामचंद्र की’ जयघोषात काळाराम मंदिरात जन्मोत्सव साजरा

पंचवटी : प्रतिनिधी
ऐतिहासिक काळाराम मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला
जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, जय सीता राम सीता अशा नामघोषात गुरुवारी (दि.26) दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी काळारामाचे दर्शन घेतले. परिसरातील गोराराम, बायकांचा राम, श्रीराम अशा विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक करून पारंपरिक वस्त्रे आणि सोन्याच्या दागिन्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. काळाराम मंदिरासह शहरातील विविध छोट्या मंदिरांमध्येही भाविकांनी रामनामाचा गजर करत श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.
पहाटे पाच वाजता काकड आरती राघवेंद्र पुजारी यांच्या हस्ते, सात वाजता रामाची महापूजा उत्सवाचे मानकरी नरेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते आचमन प्राणायाम करून तिथी वार नक्षत्र याचा उल्लेख करून प्रधान संकल्प अंतर मातृका बहिर्मातृका पुरुष सूक्त ज्ञानसुविधीने रामरायाची राजोपचार पूजा होऊन रामरायाला अभ्यंगस्नान, प्राचीन अलंकार, महावस्त्र नेसवण्यात आले. त्यानंतर दुपारी बाराच्या ठोक्याला मंदिरातील मुख्य गाभार्‍यातील श्री काळाराम यांच्या मूर्तीसमोरील पडदा हटवून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पाळण्यातील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला झोका देऊन हलविण्यात आले. राम जन्मानंतर श्रीखंड पंजरी याचा प्रसाद दाखवून तो भाविकांना वितरित करण्यात आला.
यावेळी हजारो रामभक्तांनी श्रीरामाचा एकच जल्लोष करीत प्रभू रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा देत संपूर्ण मंदिर परिसर दणाणून सोडला. काळाराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन फुलांनी सजावट केल्याने मंदिराच्या वैभवात भर पडली होती. रामजन्म झाल्यावर नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. रात्री अन्नकूटमध्ये भगवान रामचंद्रांना 56 पदार्थांचा नैवेद्य (भोग) दाखविण्यात आला. या अन्नकूटसाठी मंदिराचे असलेल्या पुजार्‍याच्या प्रत्येक घरातून एक पदार्थ बनवून आणण्यात आला होता. सर्व पूजेचे पौरोहित्य प्रणव पुजारी, आशुतोष पुजारी, श्री महंत सुधीरदास महाराज यांनी केले.
भाविकांनी काळारामाचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा लावल्या होत्या. संस्थानतर्फे या ठिकाणी महाप्रसादाचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी झालेल्या महाआरतीत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, डॉ. दिनेश बच्छाव, सुधाकर बडगुजर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विश्वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, अ‍ॅड. अक्षय कलंत्री, राघवेंद्र पुजारी, शांताराम अवसरे, शुभम मंत्री, मिलिंद तारे, अमित कोठावदे, कौशिक कोठिया, अ‍ॅड. अजय निकम आदी मान्यवर सहभागी झाले होते. भाविकांच्या मांदियाळीत रामाचा जयघोष करत ढोल-ताशांचा गजर केल्याने अवघा परिसर रामनामाने दुमदुमून गेला होता. सकाळी मंदिरात अभिषेक, नित्यपूजन झाले. त्यानंतर दया कुलकर्णी यांचा कीर्तन, मनकामेश्वर भक्त मंडळाचा भजन कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांनी राम मंदिरात रामरक्षा पठण केले.

Birth anniversary celebrated at Kalaram temple amidst chants of ‘Siyavar Ramchandra Ki’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago