एकाच ठिकाणी 3 दिवसांपासून उभी होती गाडी
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात एकीकडे गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी (दि. 21) सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे उभ्या असलेल्या एका मारुती ओम्नी व्हॅनमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला आहे. ओम्नी गाडी गेल्या तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याची माहिती समोर येत असल्याने या घटनेबाबत संशय बळावला आहे. शुभम बाळू पवार (वय 41, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर, नाशिक) असे मृताचे नाव आहे.
मालेगाव स्टॅण्ड परिसरात उभ्या असलेल्या मारुती ओम्नी (एमएच 15-जीआर 8974) वाहनाच्या मागील दोन सीटांमधील मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, वाहनात आणि थेट रस्त्यापर्यंत रक्ताचे ओघळ पसरलेले दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.
प्राथमिक माहितीनुसार, सदर ओम्नी व्हॅन मोहन भैरू भगत (रा. तळेगाव, महिरावणी) यांच्या मालकीची असल्याचे समजते. गणेशोत्सवामुळे मालेगाव स्टॅण्ड व पंचवटी परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची आणि भाविकांची मोठी गर्दी असते. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी तीन दिवसांपासून व्हॅन उभी असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
Blood-stained body found in Maruti Omni.
लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…
कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…
सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…
अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…
महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…