25 हजारांचा दंड; अन्य चौघांची निर्दोष मुक्तता
सिडको : प्रतिनिधी
जुन्या भांडणाची कुरापत काढून पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्यानंतर लोखंडी फावड्याने डोक्यात आणि तोंडावर वार करून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल एन. रोकडे यांनी हा निकाल दिला. आरोपी विशाल राजाराम कापसे (30, रा. माळवाडी, मांडसांगवी, नाशिक) याला भादंवि कलम 302 अन्वये दोषी ठरविण्यात आले असून, त्याला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
आरती विशाल कापसे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 16 मे 2022 रोजी रात्री माळवाडी, मांडसांगवी येथील आरोपीच्या घरात हा प्रकार घडला होता. जुन्या वादातून आरतीसोबत भांडण झाल्यानंतर आरोपींनी तिच्याशी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी क्रमांक 2 ते 5 यांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी पती विशाल कापसे याने घराजवळ पडलेला लाकडी दांडा असलेला लोखंडी फावडा घेऊन आरतीच्या डोक्यावर व चेहर्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आरतीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विशाल कापसे याच्यासह सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा ऊर्फ अलका निवृत्ती कापसे आणि बंटी निवृत्ती कापसे यांच्याविरुद्ध खून, मारहाण, शिवीगाळ तसेच बेकायदेशीर जमावासंदर्भातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी केला. तपासादरम्यान विविध पुरावे संकलित करून आरोपींविरुद्ध नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी तसेच तपासी अधिकार्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार न्यायालयाने केला. न्यायालयाने आरोपी क्रमांक 1 विशाल कापसे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 ते 5 यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी काम पाहिले. अभियोग कक्षातील अधिकारी तसेच आडगाव पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी यांनी खटल्याच्या कामकाजासाठी पाठपुरावा केला. गुन्हा सिद्ध करण्यासाठी तपास अधिकारी आणि कोर्ट अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ-1च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.
Husband sentenced to life imprisonment for wife’s murder
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…