नाशिक

कृषीसाठी ड्रोन, रोबोटिक्स निर्मितीला चालना

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील सर्वांत प्रमुख आणि लक्षवेधी निर्णय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागातर्फे ’महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण-2026’ जाहीर करण्यात आले आहे. राज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि जोखमीची कामे सुरक्षितपणे पार पाडली जावीत, या मुख्य उद्देशाने हे धोरण लागू करण्यात आले आहे.
या नव्या धोरणांतर्गत हवाई, सागरी तसेच जमिनीवर काम करू शकणार्‍या विविध स्वयंचलित उपकरणांच्या निर्मितीवर विशेष भर दिला जाणार आहे. शेतीमधील विविध कामे व मानवी जिवाला धोका असलेल्या अवघड परिस्थितीतील मोहिमांसाठी ड्रोन तसेच वेगवेगळ्या रोबोट्सचा वापर प्रभावीपणे करता यावा, यासाठी या प्रणालीतील उपकरणांची निर्मिती केली जाईल. या क्षेत्रातील संशोधन व विकास वाढवणे, प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे यांसारख्या उपक्रमांना या धोरणामुळे मोठी चालना मिळणार आहे.

आरोग्य क्षेत्राला दिलासा
विविध गंभीर आजार आणि रोगांचे अचूक निदान करण्यासाठी नागपूर येथे मध्य भारतातील एकमेव आणि महत्त्वाकांक्षी असा ’हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प’ (एनएचईसीपी) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

डिजिटल सुविधा
सुधारित ’भारत नेट’ कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ’महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमडीआयएल)’ नावाची विशेष हेतू वहन यंत्रणा (एसपीव्ही) स्थापन केली जाणार आहे.

ग्रामीण पेयजल धोरण
राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी ’महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण-2026’ जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत स्वच्छ आणि दर्जेदार पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करून शाश्वत विकास साधला जाईल.

रोजगार व प्रशासन
’विकसित भारत- जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याचा दिलासादायक निर्णयही घेण्यात आला आहे.

Boosting the manufacturing of drones and robotics for agriculture

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago