नाशिक

कुटुंबातच जमीन वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयांत

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणार्‍या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या 200 रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मोजणी प्रक्रियेतील प्रशासकीय विलंब आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी आता ’नियमित मोजणी’ 90 दिवसांत आणि ’द्रुतगती मोजणी’ केवळ 30 दिवसांत पूर्ण करणे महसूल विभागासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
या नव्या धोरणात ग्रामीण आणि शहरी भागांसाठी मोजणीचे सुस्पष्ट दर आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात 2 हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी 2 हजार रुपये (द्रुतगतीसाठी 8 हजार रुपये), तर शहरी भागात 1 हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी 3 हजार रुपये (द्रुतगतीसाठी 12 हजार रुपये) शुल्क आकारले जाईल.

Land measurement for family partition for just ₹200.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago