नाशिक

निवृत्तिनाथ पालखीचा दुसरा मुक्काम सातपूरला

सिडको : विशेष प्रतिनिधी
अनादि काळापासून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार्‍या संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांंच्या पालखीचा दुसरा मुक्काम बुधवारी (दि. 11 जून) सातपूर गावात मोठ्या उत्साहात झाला. त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान केलेल्या या पालखीचे स्वागत करण्यासाठी सातपूर ग्रामस्थांनी एक महिना आधीच तयारी सुरू केली होती. नाशिक पंचायत समितीच्या प्रांगणात आज (दि. 12) सकाळी नऊ वाजता नाशिककरांच्या वतीने नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर सातपूरमध्ये पालखी स्वागत समितीची स्थापना करण्यात आली होती. यात अध्यक्ष नीलेश भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील मौले, नितीन निगळ, गोकुळ निगळ, विजय भंदुरे, शांताराम निगळ, अमर काळे, माजी नगरसेविका सीमा निगळ, तुकाराम बंदावणे यांच्यासह ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता. वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण गावकर्‍यांनी पुढाकार घेतला होता. स्वागतापासून भोजन, निवास, स्नान, शौचालये, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता अशा सर्व व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आल्या. बुधवारी सकाळी पपया नर्सरी ते सातपूर गावादरम्यान बँडपथकासह स्वागतयात्रा काढण्यात आली.

पालखी आणि सातपूर यांचे 150 वर्षांचे नाते

संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचा पहिला मुक्काम जवळपास 150 वर्षांपासून सातपूर गावात होत आहे. यामुळे सातपूर ग्रामस्थांसाठी ही परंपरा अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे.

पहिल्यांदाच जनता विद्यालय आणि भाजी मंडईचा समावेश

यंदा दिंडीच्या स्वागतासाठी विशेष बाब म्हणजे, जनता विद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडई यांचा प्रथमच स्वागत व्यवस्थेत समावेश करण्यात आला होता. पावसाचा अंदाज लक्षात घेता जनता विद्यालयात वाहन पार्किंगची, तर भाजी मंडईत वारकर्‍यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.

Editorial Team

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago