नाशिक

नोंदणी केलेला संपूर्ण मका खरेदी करा

शेतकर्‍यांची मागणी; नवीन खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला

डांगसौंदाणे : प्रतिनिधी
डांगसौदाणे येथे आदिवासी विकास संस्थेमार्फत हमीभाव मका खरेदी केंद्र आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू केले आहे. शासनाने नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा संपूर्ण मका खरेदी करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
येथील केंद्रावर आतापर्यंत 8,852 क्विंटल मका खरेदी केला. 574 शेतकर्‍यांनी 30,875 क्विंटलची नोंदणी केली आहे. सुमारे 2,205 हेक्टर क्षेत्रावरील मका नोंदणी झाली आहे. मका खरेदीची 25 हजार क्विंटलची मर्यादा आहे. आठ हजार 800 क्विंटल मका खरेदी केला आहे. आणखी पाच हजार क्विंटल खरेदीचे परवानगी असून, सात हजार क्विंटल नवीन खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुढे पाच हजार क्विंटलचा नवीन प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी संस्थेचे सभापती गोकुळ जगताप, उपसभापती केदा बोरसे, सचिव जयवंत देशमुख व संचालकांनी दिली आहे.
मक्यास 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव असल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रावर गर्दी होत आहे. शेतकर्‍यांचे 120 ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे आहेत. शासनाने आदिवासी भाग असल्याने जास्तीत जास्त खरेदी करण्यासाठी मर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे. पहिल्या टप्प्यातील शेतकर्‍यांचे पैसे खात्यात जमा झाल्याने शेतकरीवर्गात आनंद व्यक्त होत आहे. मार्केटमध्ये बाराशे ते सतराशे रुपयांनी मका खरेदी होतो.
याठिकाणी 2400 रुपयांनी मका खरेदी होत असल्याने शेतकर्‍यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. मका खरेदीसाठी साळवण, गुलमाळ, बारीपाडा, वाठोडा, तताणी, केळझर, भावनगर, करंजखेड, साकोडे, मोठे साकोडे, बुधाटे, वड्याचे पाढे, डांगसौदाणेे, पठावे, मोरकुरे, भिलदर, चाफापाडा, तळवाडे, किकवारी, जोरण, कपालेश्वर, चापापाडा, निकवेल, कंधाणे, तिळवण, निरपूर, चांधाणे, वटार आदी गावांतील शेतकर्‍यांनी मका नोंदणी केली आहे. खरेदी केलेला मका लवकर उचलून पुढील शेतकर्‍यांना मका खरेदीसाठी गोदाम मोकळे करून द्यावे, अशी मागणी 938 आदिवासी सहकारी संस्थांचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे यांनी केली आहे.

Buy registered whole corn

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago