नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वर्ग (1) चे सेवानिवृत्त प्रादेशिक अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकर तसेच त्यांची पत्नी मनोरमा दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेची प्राप्त आदेशानुसार उघड चौकशी करण्यात आली, या चौकशीमध्ये परीक्षण कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नाचे 102 टक्के इतकी अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोताशी प्रमाणहीन असलेली अधिकची अपसंपदा संपदित केल्याचे निष्पन्न झाले आहे. यात त्यांची पत्नी मनोरमा दिलीप खेडकर यांनी त्यांना सहाय्य केले म्हणून, दिलीप खेडकर यांच्यावर भ्रष्टाचार अधिनियम प्रतिबंध अधिनियम त्यांची पत्नी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे सकृत दर्शनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाथर्डी पोलीस ठाण्यात (जि. अहिल्यानगर) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, याची चौकशी झाल्यानंतर आणखी मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Case registered against retired officer Khedkar.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…