नवी दिल्ली :
देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणार्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 10 एप्रिल 2026 पासून टोल वसुलीच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार, आता टोलप्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे बंद केली जाणार असून, डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे.
आजपासून टोलनाक्यांवरील ‘कॅश लेन’ पूर्णपणे बंद केल्या जातील. जर एखाद्या वाहनधारकाकडे वैध फास्टॅग नसेल किंवा डिजिटल पेमेंटची सोय नसेल, तर त्याला टोलप्लाझावरून पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. नवीन नियमांनुसार, अनेक महामार्गांवर ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ लागू केली जात आहे. टोलप्लाझावर थांबण्याची गरज आता उरणार नाही. जर एखाद्याने नियमांचे उल्लंघन करून टोलनाक्यावर गोंधळ घातला किंवा रोख रकमेचा आग्रह धरला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच, अशा वाहनांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकारही प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.
Cash banned at toll plazas from today
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…