राज्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्र शासनाने घेतली गंभीर दखल
नवी दिल्ली : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश भूभाग दुष्काळाने प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने राज्यातील परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकार्यांसह महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
नवी दिल्लीतील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी संमेलनरब्बी अभियान 2026 च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर व भागीरथ चौधरी, केंद्रीय कृषी सचिव अतीश चंद्रा, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांच्यासह केंद्र व विविध राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी संमेलनाच्या दुसर्या दिवशी, 29 सप्टेंबर रोजी सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा होणार आहे.
या चर्चेतून रब्बी हंगामासाठी समन्वित आणि परिणामाभिमुख कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देताना पाण्याची उपलब्धता, जमिनीतील ओलावा आणि त्यानुसार योग्य पीक यांचे नियोजन आधीच करणे आवश्यक असल्याचे चौहान यांनी सांगितले. पेरणीला विलंब झाल्यास उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी बियाणे, खते आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी
केले.
पाण्याचा ताळेबंद पाहूनच रब्बीचे नियोजन
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावे, असे चौहान यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्याने सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसेच जमिनीतील ओलावा यांचे मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पाणीटंचाई असलेल्या महाराष्ट्रातील भागांमध्ये कमी पाण्यात येणार्या कडधान्ये आणि तेलबिया पिकांना प्राधान्य द्यावे. पुरेशी सिंचन सुविधा असलेल्या भागात उपलब्ध पाण्यानुसार अन्य पिकांचे नियोजन करावे. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेले पीक घेतल्यास नंतर पाणीटंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
3 ऑक्टोबरनंतर पथक राज्यात
महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश क्षेत्र दुष्काळाच्या विळख्यात असल्याचे नमूद करत चौहान यांनी केंद्र सरकार राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रासह कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचे केंद्रीय पथक प्रत्यक्ष पाहणी करून आकलन करणार आहे. कर्नाटकात 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय पथक दाखल होणार असून, त्यानंतर महाराष्ट्रातही पथक पाठविण्यात येणार आहे. आपण स्वतः वरिष्ठ अधिकार्यांसह या राज्यांचा दौरा करणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.
Central team to conduct inspection visit
(भाग 1) प्रत्येक अंधश्रद्धेशी निगडित जनमानसातल्या पुरातन काळातल्या श्रद्धा निश्चितच आहेत... आई उवाच... मांजर आडवे…
आजकाल प्रत्येक घरात संध्याकाळी एक दृश्य अगदी सर्रास पाहायला मिळतं-कामानिमित्त बाहेर गेलेली माणसं घरी परततात,…
ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा; ‘विकासाच्या केवळ गप्पा नकोत‘ सुरगाणा : प्रतिनिधी तालुक्यातील उंबरदे गावातील स्मशानभूमीची…
ताणतणाव,जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग प्रेग्नन्सी का होत नाही? फर्टिलिटी क्लिनिकमध्ये…
पचनसंस्थेचे अधिक अचूक निदान एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड (ईयूएस) हे एन्डोस्कोपी आणि अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचे संयोजन असलेले आधुनिक…
भाग 2 विमानाचा पायलट निवडताना त्याच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा निकष न लावता जो इच्छुक असेल…