तीन तोळ्यांचे सोने घेऊन दुचाकीस्वार फरार
सिन्नर : प्रतिनिधी
सायखेड्याहून लुना गाडीवरून घरी परतणार्या दाम्पत्याच्या मागावर आलेल्या दुचाकीस्वाराने रस्त्यात संधी साधत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आणि भरधाव पसार झाला.
वडांगळी शिवारातील बोरगुडे वस्ती परिसरात 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. तीन तोळे वजनाची सोन्याची पोत लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण निमसे यांचे आई-वडील सायखेडा येथून लुना गाडीवरून वडांगळीकडे घरी येत होते. बोरगुडे वस्तीच्या जवळ पोहोचले असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आणि दुचाकीवरून वेगाने निघून गेला.
पोलिस दप्तरी चोरीस गेलेल्या सोन्याच्या पोतीची किंमत 40 हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. ही किंमत जुन्या सोन्याच्या दरानुसार नोंदविण्यात आली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार तीन तोळे सोन्याच्या या दागिन्याची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते.
याप्रकरणी किरण निमसे यांनी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार गिते पुढील तपास करीत आहेत.
दागिन्यांची किंमत
चार लाखांच्या आसपास
पोलिस नोंदीत सोन्याची पोत 40 हजार रुपयांची दाखविण्यात आली असली तरी ती जुना दर लक्षात घेऊन केलेली नोंद आहे. सध्याच्या सोन्याच्या बाजारभावाचा विचार करता तीन तोळ्यांच्या पोतीची किंमत सुमारे चार लाख रुपयांच्या आसपास असल्याने चोरीचा प्रत्यक्ष आर्थिक फटका मोठा असल्याचे दिसून येते.
Chain snatched from woman’s neck while chasing on a two-wheeler.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…