त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सलग शासकीय सुटट्या आल्या की त्र्यंबकेश्वरची वाहतूक व्यवस्था कशी कोलमडते, याचा प्रत्यय महात्मा गांधी जयंतीची सुट्टी (शुक्रवार) व शनिवार-रविवार जोडून आल्यामुळे पुन्हा एकदा आला आहे. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या वेळीही असाच वाहतुकीचा उडालेला गोंधळ पाहायला मिळाला होता.
शुक्रवारी (दि. 2 ऑक्टोबर) सकाळपासूनच शहरात येणार्या आणि जाणार्या वाहनांच्या काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी साधारण एक तास लागतो. मात्र, शासकीय विश्रामगृहापासून शहरात प्रवेश करण्यासाठी दीड तास आणि शहराबाहेर पडताना पुन्हा शासकीय विश्रामगृहापर्यंत पोहोचण्यासाठी दीड तास लागल्याने भाविक व प्रवासी चांगलेच वैतागले होते. त्यातच रस्त्यांची कामे रेंगाळल्याने प्रवास अत्यंत संथगतीने आणि रडतखडत करावा लागत असल्याने ‘नको ते त्र्यंबकेश्वरी येणे,‘ अशी भावना भाविक मनोमनी व्यक्त करत होते.
त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश देणारा मुख्य रस्ता (जव्हार फाटा ते नगर परिषद वाहनतळ) गेल्या एक वर्षापासून खोदून ठेवला आहे. सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर आला असतानाही या रस्त्याचे काम प्राथमिक स्तरावरच आहे.
हा रस्ता वारंवार बंद ठेवला जात असून, गजानन महाराज चौक प्रवेश कमान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर बाहेरगावच्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही. त्यातच या रस्त्यालगत सुरू असलेल्या खासगी बांधकामाचे साहित्य व आरएमसीची अवजड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक खोळंबण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Traffic system in Trimbakeshwar collapsed due to consecutive holidays.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…