नाशिक

निफाडमध्ये साहित्याचा जागर, विचारांची मेजवानी होणार

साहित्य संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : आमदार बनकर

निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड येथे होऊ घातलेल्या नाशिक जिल्हा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी निफाड उपबाजार आवारातील शेतकरी निवास येथे विचारविनिमय बैठक उत्साहात झाली. या संमेलनाच्या माध्यमातून निफाडमध्ये साहित्याचा जागर आणि विचारांची मेजवानी होणार आहे. या उपक्रमासाठी तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
निफाड येथे झालेल्या विचारविनिमय बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार बनकर होते. व्यासपीठावर माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, कवी प्रकाश होळकर, अर्जुन कोकाटे, कवी लक्ष्मण महाडिक, शीतल कुयटे आदी उपस्थित होते.
आमदार बनकर म्हणाले, की निफाड येथे साहित्य संमेलन होत आहे, ही निफाडकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची निफाड ही जन्मभूमी असून, त्यांच्या पुढाकाराने 1878 मध्ये पहिले साहित्य संमेलन पार पडले होते. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आणि भूमिकेचा निफाडकरांना अभिमान आहे. पुणे येथे जानेवारी 2027 मध्ये साहित्य परिषदेच्या माध्यमातून होणार्‍या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर निफाड येथे होत असलेले हे ग्रामीण साहित्य संमेलन माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मला जे जे सहकार्य करता येईल, ते निश्चितपणे करणार आहे, अशी ग्वाही आमदार बनकर यांनी दिली.
बैठकीच्या प्रारंभी (स्व.) विनायकदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष वि. दा. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत विविध सूचना मांडल्या. यावेळी विवेक उगलमुगले, राजेंद्र सोमवंशी, बाळासाहेब गिरी, साहेबराव बर्डे, मुकुंद ताकाटे, प्रशांत केंदळे, विशाल टरले, शीतल कुयटे, गोपाळ पाटील, जलाल महाराज, मालती वाघावकर, प्रकाश दायमा, अर्जुन कोकाटे, राजेंद्र डोखळे, लक्ष्मण महाडिक, अशोक सोनवणे, नानासाहेब बोरस्ते, प्रकाश होळकर, प्रतिभा जाधव आदींनी साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात आपल्या सूचना व भावना व्यक्त केल्या.
निफाडला लाभलेली साहित्यिक व ऐतिहासिक परंपरा, न्यायमूर्ती रानडे यांचे योगदान आणि ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्तावित संमेलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर माळी यांनी केले. संजय आहेर यांनी आभार मानले. यावेळी राजाभाऊ शेलार, राजाभाऊ राठी, अंजलीताई उगावकर, कैलास सोनवणे, सचिन होळकर, रामदास व्यवहारे, मेघा जंगम, भारतीताई कापसे, राजाबाबू होळकर, सागर पाटील कुंदे, सुहास सुरळीकर आदीसह साहित्यप्रेमी उपस्थित होते विचारविनिमय बैठक होण्यासाठी शिवाजीराजे ढेपले, सुभाष खाटेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

Niphad set to host a celebration of literature and a feast of ideas.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago