पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या शेजारी नव्याने सुरू करण्यात आलेल्या गुन्हे शाखा युनिट- 2 चे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नाशिक शहरातील गुन्ह्यांची उकल तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या युनिटची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
यावेळी पोलिस उपायुक्त किशोर काळे, सचिन बारी, सहायक पोलिस आयुक्त अद्विती शिंदे, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे तसेच गुन्हे शाखा युनिट-2 चे प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सांगितले की, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आतापर्यंत तीन गुन्हे शाखा युनिट स्थापन करण्यात आले आहेत. या युनिटच्या माध्यमातून गुन्ह्यांची उकल करण्यास तसेच गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत होणार आहे. गुन्हे शाखा युनिट 2 च्या कार्यक्षेत्रात नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प ही तीन पोलिस ठाणी राहणार आहेत. या परिसरातील गंभीर गुन्हे, गुन्हेगारांची माहिती आणि प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासासाठी युनिटकडून स्वतंत्रपणे काम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Crime Branch Unit-2 launched at Nashik Road.
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…