नाशिक : प्रतिनिधी
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यासह डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावरही आता निलंबनाची कारवाई होणार आहे.
डॉ. स्वाती चव्हाण यांना 20 सप्टेंबर 2026 रोजी रात्री पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर 21 सप्टेंबरला न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्याबाबतची अधिकृत पोलिस कागदपत्रे आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाल्याने नियमानुसार निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी 48 तासांहून अधिक काळ अटकेत किंवा पोलिस कोठडीत असल्यास नियमानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. त्यामुळे डॉ. स्वाती चव्हाण यांच्या प्रकरणातही संबंधित कागदपत्रांची छाननी करून पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान, डॉ. नीलेश जेजुरकर यांची राज्य सरकारने चार दिवसांपूर्वीच पालघर येथे बदली केली आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांना कार्यमुक्तही केले आहे. मात्र, पालघर येथे रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केल्याने ते तेथे रुजू होऊ शकले नाहीत. जेजुरकर यांना नाशिकमधून कार्यमुक्त करण्यात आले असले, तरी ते पालघर जिल्हा रुग्णालयात रुजू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची नोंद पालघर जिल्हा रुग्णालयाकडून केली जाणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीबाबतची माहिती मागविल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची पुढील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
डॉ. स्वाती चव्हाण यांच्या अटकेबाबतची अधिकृत पोलिस कागदपत्रे आम्हाला प्राप्त झाली आहेत. 48 तासांहून अधिक काळ त्या कोठडीत असल्याने नियमानुसार त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया केली जात आहे. डॉ. नीलेश जेजुरकर यांची पालघर येथे बदली झाली असून, त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ते पालघर येथे रुजू होण्यापूर्वीच अटकेत गेले. दोन्ही प्रकरणांत नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल.
– डॉ. सतीश शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक
Proposal submitted to the government for the suspension of Dr. Swati Chavan.
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…