बळीराजाला दिलासा; खरीप पिकांना मिळणार नवसंजीवनी
लासलगाव : वार्ताहर
गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी सकाळी दहा तसेच दुपारी दोनच्या सुमारास लासलगावसह परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून, सुकण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी
मिळाली आहे.
चालू हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर गेल्या महिना-सव्वा महिन्यापासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पाऊस न झाल्याने लासलगाव परिसरातील सोयाबीन, मका आणि लवकर लागवड केलेला खरीप कांदा ही पिके कोमेजू लागली होती. पिके हातातून जाण्याच्या भीतीने शेतकरी अत्यंत चिंतेत पडला होता. अनेक ठिकाणी विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याने पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, काल सकाळी व दुपारी झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांमधील ओलावा टिकून राहण्यास मदत होणार असून, पिकांना मोठे जीवनदान
मिळाले आहे.
मंगळवारी सकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि अवघ्या काही वेळातच धुवांधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी एक तास व दुपारी पाऊण तास चाललेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते व सखल भागांमध्ये पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीत कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकरी तसेच व्यापार्यांची काही काळ धांदल उडाली. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा मिळाला.
Rain visits Lasalgaon after a month.
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…