एक लाख 29 हजारांंचे दुग्धजन्य पदार्थ जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

नाशिक : प्रतिनिधी
राज्यभर सुरू असलेल्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक पथकाने रविवार कारंजा येथील मे. विजया एंटरप्रायझेेसवर कारवाई करत सुमारे एक लाख 29 हजार रुपयांचा 298.4 किलो साठा जप्त केला. हे पदार्थ मिथ्याछाप, तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिकमधील विजया एंटरप्रायझेेसची 8 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. यावेळी Inter Esterified Veg Fat (Geer) आणि Inter Estified Veg Fat (Jay Janki Gold) या दोन अन्नपदार्थांचा साठा आढळला.
या पदार्थांच्या लेबलवर Nutritional Information मध्ये Vitamin D समाविष्ट असल्याचे नमूद केले आहे. मात्र, लेबलवर आवश्यक असलेला  Fortification चा लोगो आढळून आला नसल्याचे प्रशासनाने म्हटलेे आहे. त्यामुळे या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा नवले व अश्विनी पाटील यांनी सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Dairy products worth ₹1.29 lakh seized.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *