नाशिक

शहरात आज दत्त जन्मोत्सव सोहळा

दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी
दत्त जयंतीनिमित्त आज गुरुवारी (दि. 4) शहरातील विविध परिसरात असलेल्या दत्त मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची आरास करण्यात आली आहे.
दत्त जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात आले. दत्त जयंती उत्सवानिमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या काळात हजारो भाविकांनी गुरुचरित्र पारायणासाठी व दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. एकमुखी दत्त मंदिरात पहाटे 5.30 वाजता अभिषेक असणार आहे. संध्याकाळी 6.15 वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा असणार आहे. त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद असणार आहे, तसेच भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एकमुखी दत्तमंदिराचे मठाधिपती मयुरेश बर्वे
यांनी दिली.
नाशिक शहरात अनेक पुरातन दत्त मंदिरे विविध भागात आहेत. शहरातील सिडकोतील दत्त मंदिर, देवळाली गावातील दत्त देवस्थान, जुने नाशिकरोडचे दत्त मंदिर, इंदिरानगरचे श्रद्धास्थान गुरुदेव दत्त, सातपूरचे चाळीस वर्षे जुने गुरुदेव दत्त मंदिर आणि गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध दत्त मंदिरांत लघुरुद्राभिषेक, अभिषेक, पारायण यांसह यथासांग पूजा करण्यात येणार आहे. भाविकांना सुलभपणे दर्शन मिळावे, यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
दत्त मंदिरांसह विविध चौकाचौकातदेखील दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दत्तजन्मोत्सव सोहळ्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाविकांकडून तयारी करण्यात येत होती.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे 15 लाखांची आर्थिक फसवणूक

50 लाखांच्या परताव्याचे दिले होते आमिष सिडको : प्रतिनिधी इन्स्टाग्रामवरील रील्सद्वारे कंपनीची माहिती देत 15…

3 minutes ago

नाशिकमध्ये बेकायदा बाइक टॅक्सींचा सुळसुळाट

अ‍ॅग्रिगेटर धोरणाची मंजुरी नसल्याचा परिवहन विभागाचा दावा पंचवटी : प्रतिनिधी नाशिक शहरात रॅपिडो, ओला आणि…

8 minutes ago

पवननगर पोलीस चौकी ओसाड

सिडको : प्रतिनिधी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथील पोलीस चौकी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून…

18 minutes ago

प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात लग्नमंडपात राडा

नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न येवला : प्रतिनिधी प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला.…

1 hour ago

आरोग्य ते शेतीपर्यंतच्या कामगिरीचे मोदींकडून कौतुक

मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…

1 hour ago

अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

1 hour ago