50 लाखांच्या परताव्याचे दिले होते आमिष
सिडको : प्रतिनिधी
इन्स्टाग्रामवरील रील्सद्वारे कंपनीची माहिती देत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 30 दिवसांत 50 लाख रुपये परत देण्याचे आमिष दाखवून नाशिकमधील एका व्यक्तीची आणि त्यांच्या मेहुण्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवरील रील्सद्वारे अवंतिका इंडस्ट्रीज या कंपनीची माहिती मिळाली होती. कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधून 15 लाख रुपये गुंतवल्यास अवघ्या 30 दिवसांत 50 लाख रुपये परतावा मिळेल, असे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी गुंतवणुकीसाठी पैसे वर्ग केले.
25 सप्टेंबर 2025 रोजी फिर्यादी यांच्या युनियन बँकेच्या खात्यातून 12 लाख 10 हजार रुपये, त्यांचे मेहुणे चेतन शेवाळे यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून 1 लाख 99 हजार 500 रुपये, तर फोन पेद्वारे 90 हजार 500 रुपये, अशी एकूण 15 लाख रुपयांची रक्कम अवंतिका इंटरप्रायजेसच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने फिर्यादी यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट (डीडी) काढून दिल्याचे सांगितले. मात्र, तो डीडी फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यापूर्वीच संबंधित प्रतिनिधी पसार झाल्याचे समजले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन तक्रार केली होती. वडिलांच्या आजारपणामुळे पुढील कार्यवाही करण्यास विलंब झाल्यानंतर त्यांनी 26 सप्टेंबर 2026 रोजी तक्रार अर्ज
सादर केला.
त्यानुसार 24 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे करीत आहेत.
Investment of 15 lakhs through an advertisement on Instagram
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…
अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…
कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…