महाराष्ट्र

नसरापूरच्या नराधमाला फाशी

बालिका अत्याचार : पुणे विशेष न्यायालयाचा निकाल

पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या अत्यंत धक्कादायक आणि अमानुष प्रकरणात पुणे विशेष न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील नराधम आरोपीला न्यायालयाने थेट मरेपर्यंत फाशीची (मृत्युदंड) शिक्षा सुनावली आहे. या क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, मात्र आता न्यायालयाने दिलेल्या या कठोर शिक्षेमुळे पीडित कुटुंबाला आणि संतप्त समाजाला मोठा कायदेशीर न्याय मिळाला आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नसरापूर गावात एका साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर पाशवी बलात्कार करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अत्यंत जलद गतीने आणि सूक्ष्म तपास केला. तांत्रिक व वैद्यकीय पुराव्यांची योग्य सांगड घालत पोलिसांनी विशेष न्यायालयात भक्कम आरोपपत्र दाखल केले, ज्यामुळे खटला वेगाने चालवणे शक्य झाले.
बालकांच्या सुरक्षेच्या महत्त्वाचा निकाल
विशेष न्यायालयाच्या या निकालामुळे समाजाला एक अतिशय स्पष्ट आणि कठोर संदेश गेला आहे की, लहान मुलांवरील अशा पाशवी अत्याचारांना कायद्याच्यादरबारात कोणतीही माफी नाही. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुरुवातीपासूनच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी केली होती. जलद गतीने चाललेला हा खटला आणि विशेष न्यायालयाने दिलेला फाशीचा निकाल यामुळे न्यायव्यवस्थेवरील सामान्य जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निकाल एक महत्त्वाचा कायदेशीर दाखला ठरणार आहे.
नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम- 1 मे 2026 (संध्याकाळ) – नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय. 2 मे 2026- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले. मे 2026 चा पहिला आठवडा – शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. याच काळात – नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान – पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, मडीएनएफ, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले. 16 मे 2026 – अवघ्या सुमारे 15 दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे 1 हजार 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. 28 मे – न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.जून 2026 – सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली. 20 जून 2026च्या सुमारास – दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली. 25 जून 2026 – न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन करण्यात आले.

न्यायाधीश म्हणाले, आता फासावर चढा
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. निकालवाचनानंतर न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला ठणकावत म्हटलं की, आत्ता फासावर चढा. निकाल सुनावताना पुणे विशेष न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने स्पष्ट केले की, हे प्रकरण निश्चितच ’दुर्मिळातील दुर्मिळ’ या श्रेणीत मोडते. अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप, असहाय आणि
स्वतःचा बचाव करू न शकणार्‍या चिमुकलीवर असा क्रूर प्रसंग ओढवणे, हा अत्यंत विकृत आणि अमानुष प्रकार आहे. आरोपीने या गुन्ह्यात दाखवलेली क्रूरता पाहता तो कोणत्याही दयेस किंवा सहानुभूतीस पात्र नाही. समाजात अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि अशा विकृत मानसिकतेला कठोर वचक बसवण्यासाठी या प्रकरणात फाशीचीच शिक्षा देणे सर्वाधिक न्याय्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

वेगवान न्यायदानाचा नवा बेंचमार्क : मुख्यमंत्री
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात 59 दिवसांत न्यायप्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाने आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावून वेगवान न्यायदान देऊन नवीन बेंचमार्क तयार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायप्रक्रियेतील संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देऊन या प्रकरणात 16 दिवसांत 55 साक्षीदारांच्या साक्षी, तपासणी आणि उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. 25 जून 2026 रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आणि 29 जून 2026 रोजी तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली. घटना घडल्यानंतर अवघ्या 59 दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षा झाल्याने हा न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे ते म्हणाले.

अजय मिसर यांचा प्रभावी युक्तिवाद
नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी प्रभावी युक्तिवाद करत बाजू मांडल्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने सरकारी पक्षाचा संपूर्ण युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरत भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील तीन गंभीर कलमांखाली आरोपी भीमराव कांबळे याला स्वतंत्रपणे फाशीची शिक्षा सुनावली आहे. मिसर यांच्या मते, सीसीटीव्ही, डीएनए आणि वैद्यकीय पुराव्यांमुळे आरोपीने चिमुकलीला जवळपास 40 मिनिटे ताब्यात ठेवून अमानुष अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. आरोपीने अपघाताचा दावा केला होता, मात्र तो सर्व पुराव्यांमुळे पूर्णपणे खोटा ठरला. आरोपीच्या 65 वर्षांच्या वयाचा आधार घेऊन शिक्षेत सवलत देण्याचा मुद्दा ग्राह्य धरू नये, यासाठी मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 12 महत्त्वाचे निर्णय न्यायालयासमोर मांडले. दुर्मीळातील दुर्मीळ स्वरूपाचा असल्याचे नमूद केले

 

 

Death penalty for the Nasrapur monster.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

4 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago