राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

अमेरिका, इराणचे हल्ले थांबवण्यावर एकमत

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तात्पुरती शांतता

वॉशिंग्टन/तेहरान :
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ गेल्या काही दिवसात पुन्हा सुरू असलेल्या लष्करी संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांनी सध्यापुरती माघार घेण्याचा (स्टँड डाऊन) निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने या वृत्ताला दुजोरा दिला. दोन्ही देशांनी एकमेकांवरील लष्करी हल्ले (कायनेटिक क्टिव्हिटी) थांबवण्याचे मान्य केले आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध भडकण्याच्या शक्यतेला तात्पुरता का होईना, पण पूर्णविराम मिळाला आहे.
युद्धबंदीनंतर गेल्या आठवड्याभरात दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला होता. इराणने व्यावसायिक जहाजांवर हल्ले करून युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकेने इराणच्या लष्करी, ड्रोन आणि रडार तळांवर हवाई हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखाती देशांमधील कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती. या वाढत्या संघर्षामुळे या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये झालेल्या प्राथमिक शांतता कराराचे (एमओयु) भवितव्य धोक्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणने कराराचे उल्लंघन सुरूच ठेवल्यास कठोर लष्करी कारवाईचा इशारा दिला होता.सध्याच्या तडजोडीनुसार, दोन्ही देशांनी व्यावसायिक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून विनाअडथळा आणि सुरक्षितपणे प्रवास करू देण्याचे मान्य केले आहे. जागतिक इंधन पुरवठ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. याशिवाय, युद्धविराम करारातील अटींवर आणि या धोरणात्मक जलमार्गाच्या प्रशासनाबाबत निर्माण झालेले मतभेद सोडवण्यासाठी मंगळवारी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि इराणमध्ये तांत्रिक चर्चा होणार आहे. या चर्चेतूनच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यावसायिक वाहतूक आणि भविष्यातील शांततेचा मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे.

US, Iran agree to halt attacks

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago