नाशिक

रामकुंड परिसर बंद ठेवण्याचा निर्णय

अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ; अवघ्या 19 दिवसांवर कुंभ ध्वजारोहण सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा अवघ्या 19 दिवसांवर आला असला, तरीदेखील अद्याप रामकुंडावरील विकास कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे टीकेचे धनी ठरत असलेल्या मनपा प्रशासन आणि कुंभ प्राधिकरणाने संथगतीने सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी रामकुंड परिसर बंद ठेवून कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शेखर सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, डॉ. भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल आदी उपस्थित होते.
येत्या 31 ऑक्टोबरला रामकुंड परिसरात ध्वजारोहण सोहळा होणार आहे. एकीकडे ध्वजारोहण सोहळ्याचे नियोजन सुरु असताना रामकुंडावर सुरू असलेल्या कामांची गती संथ असल्याचे चित्र दिसून येत आहे. रामकुंड परिसरासह गोदावरी नदीच्या घाटांवर स्वच्छता, काँक्रीटीकरण, सुशोभीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. गांधी तलाव परिसरातील स्वच्छतेचे कामही हाती घेण्यात आले आहे. बांधकामांमुळे साचलेला मलबा आणि अनावश्यक साहित्य हटविण्याचे काम सुरू असले तरी कामाची गती संथ आहे. त्यामुळे रामकुंड परिसर हा भाविकांसाठी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

25 ऑक्टोबरला विश्वविक्रमी शंखनाद

ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रम होतील. यात 25 ऑक्टोबर 2026 रोजी शंखनाद होईल. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. त्याचे प्रमाणपत्र ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान करण्यात येईल. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कॉफीटेबल बुकचे प्रकाशन, सायंकाळी गोदावरी नदीची आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शैव-वैष्णव आखाडे येणार एकत्र

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शैव आणि वैष्णव आखाडे एकत्र येणार आहेत. यानिमित्त गोदाघाटावर संयुक्त महाआरतीचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेत हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून यामाध्यमातून साधू-संतांमधील एकात्मता आणि समन्वयाचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीदरम्यान काही कामांमुळे नागरिकांना तात्पुरता त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, ही कामे भाविकांच्या सुविधा आणि शहराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
– शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

Decision to keep the Ramkund area closed.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

8 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

8 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

9 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

9 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

9 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

9 hours ago