नाशिक

जि.प. इमारतीच्या आवारात डेंग्यूचे डास

आरोग्य विभागाने बजावली नोटीस

नाशिक : प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून, चालू ऑगस्ट महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. दरम्यान, शहरात डेंग्यू डासांची स्थाने नष्ट केली जात आहेत. दरम्यान, डेंग्यूला कारणीभूत ठरणार्‍या शासकीय आस्थापनांनादेखील नोटिसा धाडल्या जात असून, आतापर्यंत जिल्हा परिषद नवीन इमारतीच्या बेसमेंटमध्ये तसेच आडगाव येथील एसटी वर्कशॉप परिसरात डेंग्यूच्या उत्पत्तीचे स्थळे आढळल्याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
शहरातील शासकीय कार्यालय, इमारती डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहेत. मनपा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत आरोग्य विभागाने त्यांना साफसफाई करा व हॉटस्पॉट नष्ट करा, अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही कार्यवाही न केल्यास दंड आकारला जाईल, अशा इशारा दिला आहे. बांधकाम साहित्य व इतर अडगळीच्या वस्तूंमध्ये पाणी साचून डेंग्यू डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण आहे. ते पाहता आरोग्य विभागाने सहाही विभागांत ज्या बांधकाम साइट सुरू आहेत, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
बांधकाम साइट्स रडारवर-शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असून, त्यासाठी अनेक ठिकाणी पाया खोदण्यात आला आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे चित्र आहे. एसटी वर्कशॉप येथे अडगळीत पडलेले टायर, ट्यूब व इतर भंगार साहित्य होते. त्यात पाणी साचले व डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना नोटिसा बजावल्या. साफसफाई करून औषध फवारणी करून घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात तब्बल 1670 रुग्ण संशयित सापडले. मागील जुलै महिन्यात 33 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने डेंग्यू स्थळांची शोधमोहीम हाती
घेतली आहे.

Dengue mosquitoes in the Zilla Parishad building premises.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago