नाशिक

रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ सिडकोतील महिलेचा मृत्यू

अपघात की घातपात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण

सिडको : प्रतिनिधी
कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवर्‍हे परिसरात गेलेल्या सिडकोतील 34 वर्षीय विवाहित महिलेचा रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी घडली. रूपाली नीलेश पाटील (वय 34, रा. शिव नारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात होता की घातपात, याबाबत संशय व्यक्त होत असून, वाडीवर्‍हे पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
रूपाली पाटील या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी त्या नेहमीप्रमाणे कामानिमित्त पवननगर येथील उमा हॉस्पिटलमधील ओमकार लॅबमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर त्या मित्र दीपक सौंदाणे याच्यासोबत सांजेगाव येथील मिर्ची रिसॉर्टमध्ये गेल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
दुपारी सुमारे 1.30 वाजता दोघे रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना प्रवेशद्वाराजवळ वाहन मागे घेताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रूपाली यांना वाहनाची धडक बसल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर रूपाली यांच्यासोबत असलेला दीपक सौंदाणे याला वाडीवर्‍हे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अपघात की घातपात, याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, अशी माहिती वाडीवर्‍हे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मयत रूपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Woman from CIDCO dies near resort entrance

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago