नाशिक

शहरात आज होणार धन्वंतरीचे पूजन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात आज शुक्रवारी ठिकठिकाणी भगवान धन्वंतरी पूजन उत्साहात साजरे केले जाणार आहे.
आयुर्वेदाचे उद्गाते आणि आरोग्याची देवता मानल्या जाणार्‍या भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने दीपोत्सवातील धनत्रयोदशीच्या पर्वाला सुरुवात
होत आहे.
नाशिकमधील प्रतिष्ठित सुशीला चिकित्सालय व आयुर्वेद संशोधन केंद्रातर्फे 35 व्या धन्वंतरी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी 11.45 वाजता अशोक स्तंभ येथील मुख्य शाखेत पार पडणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान श्री धन्वंतरीची आरती व पूजन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, ज्येष्ठ उद्योजक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, नाएसो व सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक वैद्य विक्रांत व वैद्य नीलिमा यांनी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. प्रभुदेव आयुर्वेदालय सेवा संस्था भाभानगर येथे वैद्य थिकळे (एमडी आयुर्वेद चिकित्सा) व अंजली थिगळे एमडी आयुर्वेद स्त्रीरोग यांच्या वतीने 5
फुटी सुवर्ण धन्वंतरीचे पूजन शुक्रवारी सकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे. तसेच नाशिकमधील प्रमुख आयुर्वेदिक महाविद्यालये, पंचकर्म केंद्र आणि रुग्णालयांमध्ये धन्वंतरी पूजन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. गृहलक्ष्मी व व्यावसायिक पूजन घरोघरी तसेच व्यापारी पेठांमध्ये (सराफ बाजार, मुख्य बाजारपेठ) धन्वंतरी पूजनासोबतच धनधान्याची तसेच धनाची व समृद्धीची देवता कुबेराचे पूजन व नवीन हिशेबाच्या वह्यांची पूजा केली जाणार आहे. आजचा सायंकाळचा पूजा मुहूर्त (प्रदोष काळ) सायंकाळी 6.31 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत.

 

Dhanvantari will be worshipped in the city today.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दानाचे महत्त्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने विकत घेण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे भाव…

7 hours ago

उजव्यांना धडा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे दोघेही पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचे…

7 hours ago

रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू

नाशिक : विशेष प्रतिनिधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा…

7 hours ago

नाकाबंदीत दोन टेम्पो, ट्रकसह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

दहिवाळ, दरेगाव परिसरात वनविभागाची कारवाई मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई…

7 hours ago

नाशिकरोडच्या कारागृहात रक्षकाच्या अंगझडतीत सापडले 33 ग्रॅम चरस!

कैद्यांना विक्रीसाठी आणल्याचा संशय; गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये टेपने गुंडाळून ठेवला होता अमली पदार्थ नाशिकरोड : विशेष…

7 hours ago

दारू पिण्यास नकार दिल्याने रिक्षाचालकाला मारहाण

सातपूरमधील कार्बन नाका परिसरातील घटना सिडको : प्रतिनिधी दारू पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी…

8 hours ago