नाशिक

दिवाळीच्या सुटीत एसटीच्या जादा फेर्‍या

22 नोव्हेंबरपर्यंत विशेष नियोजन

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीच्या सुटीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने 1 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विविध मार्गांवर नियमित व जादा बसफेर्‍यांचे नियोजन केले आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ऐन दिवाळीच्या सणात होणारी 15 टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रवाशांवर आर्थिक भार पडू नये म्हणून एसटी महामंडळाने यंदाची हंगामी परिवर्तनशील भाडेवाढ पूर्णपणे स्थगित केली आहे. त्यामुळे यंदा प्रवाशांना कोणत्याही दरवाढीविना नेहमीच्या नियमित तिकिटातच दिवाळीचा प्रवास करता येणार आहे.
दिवाळीनिमित्त शिवाजीनगर (पुणे) मार्गावर सर्वाधिक 104 नियमित व जादा बसफेर्‍यांचा समावेश असून, बोरिवलीसाठी 12 नियमित बसफेर्‍या चालविण्यात येणार आहेत. याशिवाय, सप्तशृंगगडासाठी 22, तर त्र्यंबकेश्वरसाठी 40 बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. संभाजीनगर मार्गावर 8, धुळे 10, साक्री 4 आणि नंदुरबार 6 जादा बसफेर्‍या सोडण्यात येणार आहेत. तसेच जळगावसाठी 1 आणि शिर्डीसाठी 6 जादा बसफेर्‍यांचे नियोजन आहे. कसारा मार्गावर 8, तर सटाणा मार्गावर 20 ई-बसफेर्‍या चालविण्यात येणार आहेत.
दिवाळीच्या काळात ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नंदुरबार, अहिल्यानगर, संभाजीनगर, शिवाजीनगर, धुळे आणि सटाणा या मार्गांवर वातानुकूलित ई-बस धावणार आहेत. याशिवाय, तालुका व ग्रामीण भागातील प्रवाशांची गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन जादा बसफेर्‍या चालविण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक विभागाकडून सांगण्यात
आले आहे.

Extra ST bus services during Diwali holidays

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दानाचे महत्त्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने विकत घेण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे भाव…

7 hours ago

उजव्यांना धडा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे दोघेही पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचे…

7 hours ago

रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू

नाशिक : विशेष प्रतिनिधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा…

7 hours ago

नाकाबंदीत दोन टेम्पो, ट्रकसह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

दहिवाळ, दरेगाव परिसरात वनविभागाची कारवाई मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई…

7 hours ago

नाशिकरोडच्या कारागृहात रक्षकाच्या अंगझडतीत सापडले 33 ग्रॅम चरस!

कैद्यांना विक्रीसाठी आणल्याचा संशय; गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये टेपने गुंडाळून ठेवला होता अमली पदार्थ नाशिकरोड : विशेष…

7 hours ago

दारू पिण्यास नकार दिल्याने रिक्षाचालकाला मारहाण

सातपूरमधील कार्बन नाका परिसरातील घटना सिडको : प्रतिनिधी दारू पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी…

8 hours ago