12 कक्षांची व्यवस्था, रुग्णांची गैरसोय दूर होणार
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील डायलिसिस रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (बिटको) येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्र सुरू केले जाणार आहे. या डायलिसिस सेंटरसाठी दोन कोटींची तरतूद केली आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवली जात असून, सहा मक्तेदारांनी डायलिसिस सेंटरसाठी तयारी दर्शवली आहे.
प्रशिक्षित नर्स, वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने हे सेंटर चालवले जाणार आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच डायलिसिस सेवा रुग्णांना मिळणार आहे. या केंद्रामुळे रुग्णांची डायलिसिससाठी होणारी परवड थांबणार आहे. या निविदांवर लवकरच आयुक्त निर्णय घेणार आहेत.
नाशिक महापालिकेच्या वतीने स्वतःच्या व्यवस्थापनाखाली डायलिसिस सेवा सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात ही सुविधा होती. मनपाच्या नव्या केंद्रामुळे शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयात कमी दरात ही सेवा उपलब्ध होणार आहे. या केंद्राच्या सुरळीत कार्यान्वयनासाठी लागणार्या मनुष्यबळाची नियुक्ती आउटसोर्सिंग पद्धतीने करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
बिटको रुग्णालयात लवकरच डायलिसिस सेंटर सुरू होणार आहे. सामान्य नागरिकांना परवडणार्या दरात ही सेवा दिली जाईल.
-डॉ. विजय देवकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…