नाशिक

शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात

स्वा. सावरकर थोर समाजसुधारक : बडगुजर

नाशिक : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगतं अग्निकुंड म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शहर आणि परिसरात साजरी करण्यात आली. भगूर येथील जन्मभूमीत सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिनव भारत मंदिर तसेच शहरातील आस्थापनांमध्ये सावरकर यांना अभिवादन करण्यात आले.

भगूरचे भूषण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी आणि थोर समाजसुधारक होते. त्यांचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर
यांनी केले.
सावतानगर (सिडको) येथे सावरकर सभागृहात स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस बडगुजर आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी सावरकरांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवताना बडगुजर बोलत होते. मातृभूमीच्या प्रेमासाठी सावरकरांनी आपले सर्वस्व अर्पण केले. अनेक हालअपेष्टा त्यांनी सोसल्या, मात्र ब्रिटिश सत्तेसमोर लाचारी न पत्करता त्यांनी कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, असेही बडगुजर आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी डॉ. महेश निकम, रमेश जावरे, सुरेश होळकर, विष्णू भुरे, बाबाजी अहिरे, बापू बोरसे, अनिल कर्नावट, जगन्नाथ कुर्‍हे, श्रीहरी पवार, नानासाहेब निकम, आबा हिरे, भाऊसाहेब बदाने, भालचंद्र नेरकर, धोंडीराम बोडके, सविता कुंभार, कृष्णा शिरसाट, प्रकाश खिंवसरा, विजय जाधव, भारत शेळके, अल्केश पाटील, गोपीनाथ सोनवणे, वाल्मीक कदम, धनसिंग पाटील, वसंत चौधरी, साहेबराव लांडगे, अर्जुन माळी, श्रीराम जाधव, राजाराम भोसले, एकनाथ आनेराव, सावता मंडलिक, विलास किबे, हरिभाऊ आढाव, नंदकुमार गोसावी, साहेबराव कोळपे, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

 

The eternal me… the infinite me
The city is filled with enthusiasm on the occasion of Swatantryaveer Savarkar Jayanti

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago