नाशिक

इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस व कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा

प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस गोडसे यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नाशिकरोडची इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस व कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा केली. दोन्ही प्रेसमधील आधुनिकीकरण, उत्पादन, गुणवत्ता, कारखान्यांमधील सद्यस्थिती या सर्व गोष्टींची माहिती गोडसे यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधान मोदींनी नाशिकला येऊन प्रेस कामगारांशी संवाद साधावा, अशी विनंती गोडसे
यांनी केली.
या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित होते. त्यांच्या पुढाकारामुळे ही भेट शक्य झाल्याचे जगदीश गोडसे यांनी नमूद केले. अतिशय व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मोदी यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस संबंधित सर्व बाबी बारकाईने ऐकून घेतल्या. कामगारांच्या भावना, प्रेसचा शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास आणि भविष्यातील वाटचाल याबाबत त्यांनी आस्थेने माहिती घेतली.
जेव्हा त्यांना सांगण्यात आले की, देशाच्या इतिहासातील पहिल्या कागदी चलनाच्या निर्मितीशी नाशिकच्या भूमीचा ऐतिहासिक संबंध आहे, तेव्हा त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. इंडिया सिक्युरिटी प्रेसने ई-पासपोर्टची छपाई यशस्वीपणे करून देशाच्या सेवेत दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी मनापासून कौतुक केले. हे कौतुक केवळ एका संस्थेचे नसून, ते हजारो कष्टकरी हातांचे, ज्यांनी आपल्या घामाने आणि मेहनतीने या संस्थेची प्रतिष्ठा उंचावली आहे त्यांचे आहे. कामगारांच्या श्रमाला जेव्हा देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून दाद मिळते, तेव्हा तो क्षण प्रत्येक कामगारासाठी अभिमानाचा असतो, असे गोडसे यांनी नमूद केले.
गोडसे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, देशाच्या
सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीसमोर प्रेसचा, प्रेस कामगारांचा आणि नाशिकचा विषय मांडण्याची सुवर्णसंधी मिळणे ही निश्चितच मोठी जबाबदारी होती. पंतप्रधानांशी भेट हा माझ्या आयुष्यातील एक मोलाचा प्रसंग आहे. आपण ज्या संस्थेत काम करतो, ती केवळ एक सरकारी संस्था नाही; ती देशाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. प्रेसचा गौरव, भवितव्य आणि येथील कष्टकरी कामगारांचे हित यासाठी आमचा संघर्ष आणि प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरूच राहतील.

आमच्या पुढील लढ्याची ताकद
कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने मार्गदर्शन करणारे आणि गरजेच्या वेळी खंबीरपणे साथ देणारे नेतृत्व लाभणे ही आमच्यासाठी मोठी ताकद आहे. राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसते. ते समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असते. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी थेट संवाद हीच आमच्या पुढील लढ्याची ताकद आहे.

Discussion regarding issues concerning India Security Press, Currency Note Press, and the workers.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago