डॉक्टर्स डे स्पेशल
भाग – ४
डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
अचानकपणे येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याने एखादी व्यक्ती क्षणात होत्याची नव्हती होते, असे तुम्ही अनेक प्रसंग बघितले असतील, किव्हा ऐकले असतील. एक महिन्यांपूर्वी असाच एक प्रसंग, डॉ. गौरव गांधी यांच्या बाबतीत घडल्याचे ऐकले होते. सोळा हजाराहून अधिक हृदयाच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या हार्ट सर्जन वर असा प्रसंग ओढवतो, याबद्दल सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
भावी डॉक्टरांना गंडा; दिली विमानाची बोगस तिकिटे
अनेकांनी याची कारणमीमांसा देखील केली होती. यावर लेख लिहिण्याचा माझा उद्देशही असाच होता. सर्वसामान्यांनी या दुर्घटनेतून काहीतरी बोध घ्यावा, सावध व्हावे, आणि वेळेत स्वतःला सावरून आपले शरीर, मन आणि जीवन सुदृढ करून सुरक्षित करावे, हा हेतू. एक डॉक्टर या नात्याने मी ही माझी जबाबदारी समजतो, म्हणून ही लेख मालिका. परंतु, ही घटना ज्यांच्या बाबतीत घडली, ते एक निष्णात हृदय शल्यविशारद होते.
शेतात कामाला जाण्यास सांगितल्याने मुलाने केला जन्मदात्या पित्याचा खून
नजीकच्या काळात अनेक तरुण डॉक्टरांच्या बाबतीत अशा घटना कानावर पडत आहे, अगदी नाशिकात सुद्धा घडले आहे. आज १ जुलै, आज “राष्ट्रीय डॉक्टर्स डे” आहे. म्हणून मला असे वाटले की, डॉक्टरांना याबाबत सावध करणे गरजेचे आहे. तसेच, सर्वसामान्यांनाही जाणीव असावी की तुमच्या डॉक्टरचे जीवनमान कसे आहे, त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती काय असते, कशी असते, तो कुठल्या परिस्थितीत काम करतो. रुग्ण म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या तर डॉक्टरांबद्दल आपला गैरसमज होणार नाही, आणि झालेला असेल तर तो दूर होईल.
लाभार्थी कर्ज बुडवतो, हीच राष्ट्रीयीकृत बॅकांची मानसिकता
मी एक डॉक्टर असल्यामुळे, डॉक्टरांचे जीवन कसे असते याची मला जाणीव आहे. त्यांच्या विचारसरणी बद्दलही थोडीफार माहिती आहे. बऱ्याच डॉक्टरांचे उद्दीष्ठ, ध्येय आणि मार्ग अगदी शालेय जीवनापासून ठरलेले असतात. जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ते डॉक्टर होतात. वेळ, श्रम, पैसा ही त्यांची गुंतवणूक असते. त्याग, सय्यम, सातत्य, एकाग्रता आणि सेवाभाव या तत्वांच्या आधारावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरवात करतात.
दोन चार टक्क्यांचा अपवाद सोडला तर बहुतांश डॉक्टरांचा प्रवास असाच झालेला असतो. खुप साऱ्या आशा आणि अपेक्षा ठेवून प्रॅक्टिसला सुरवात होते. परंतु, व्यवसायात उतरल्यानंतर मात्र चित्र वेगळेच दिसते. स्वतःची प्रॅक्टिस वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. क्लिनिक/हॉस्पिटल टाकण्यासाठी जागा, उपकरणे, मनुष्यबळ यासाठी अमाप पैसा लागतो. ते नसेल तर कुठेतरी नोकरी करावी लागते, कुणाच्यातरी हाताखाली काम करावे लागते.
शिवसेना फुटीत अजितदादांचा मोठा हात; मंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ
कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तर नॉन मेडिकल व्यक्तीच्या आदेशांनुसार काम करावे लागते. तिथे टार्गेट्स दिले जातात. स्वतःच्या हॉस्पिटलसाठी घेतलेल्या कर्जामुळे बँकेचे हप्ते भरण्याचे दडपण असते. त्यात भर म्हणून, रुग्णांच्या अपेक्षा, शासकीय नियम, हॉस्पिटल विषयक कायदे, परवाने, परवानग्या, इन्शुरन्स कंपन्यांचे नियम, सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करता करता, त्याचे तणाव आणि आजारात केव्हा रूपांतर होते, त्या डॉक्टरला लक्षातच येत नाही.
भावी डॉक्टरांना गंडा; दिली विमानाची बोगस तिकिटे
डॉक्टरांनीही आपल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असतो. त्यासाठी रात्री-बेरात्री रुग्ण बघणे, त्याचे रात्रीतून इमर्जन्सी ऑपरेशन करणे, त्याला जीवनदान देण्यासाठी स्वतःची झोप, अन्नपाणी, स्वतःची फॅमिली याचा त्याग करून आपल्या रुग्णांचा जीव वाचवण्यात दंग असतो. डॉ. गांधींसारखे डॉक्टर्स जे खूप जास्त बिजी असतात, खुपसारे ऑपरेशन्स करतात, २४ पैकी १४ – १६ तास काम करतात, ते काही गोष्टी विसरतात.
ज्या डॉक्टरांना तासंतास ऑपरेशन करावे लागते, त्यांना वेळेवर जेवण, पाणी, आराम, झोप न मिळाल्यामुळे ताण वाढतो. वेळी-अवेळी उठणे झोपणे, खाणे पिणे, फटाफट उरकायचे म्हणून फास्ट फ़ुड्सवर पोट भरायचे, पाणी पिण्याचेही भान नसते, काम सुरू करण्याची वेळ असू शकते परंतु संपण्याची वेळ नसते.
सातपूरला महिलेची गळा चिरून हत्या आरोपी फरार
असे करत करत प्रत्येक रुग्णाच्या उपचारात इतका हरवून जातो की आपल्यालाच कळत नाही की, आपण त्याचा स्वतःवर किती स्ट्रेस ओढावून घेत असतो. आरोग्यसेवेच्या यज्ञ कुंडात, स्वाहा म्हणत आपण आपल्या आरोग्याची आहुती देत असतो. आतल्या आत तीळ तीळ जळत असतो. स्वतःचे बीपी, शुगर, वजन वाढवत असतो, पचन संस्थेची वाट लावत असतो. मेंदू थकून जातो पण काम काही संपत नाही. म्हणून मला असे वाटते की, प्रत्येक डॉक्टरने थोडासा वेळ काढून काही विषयांवर विचार करायला हवा.
मोटरसायकल आणि बसच्या भीषण अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू
आपण डॉक्टर कशासाठी झालो आहे? या मूळ प्रश्नाचे उत्तर प्रत्येक डॉक्टरने शोधणे आवश्यक आहे. “रुग्णसेवा” करण्यासाठी की आणखी कशासाठी? आई वडिलांची इच्छा म्हणून की स्वतःची इच्छा म्हणून? नात्यात, शेजारांत, माहितीत कुणीतरी डॉक्टर झाला म्हणून आपणही डॉक्टर झालात का? आणि जर डॉक्टर झालाच आहात तर नेमकं काय करायचं आहे? प्रामाणिकपणे उत्तर दिले तर कदाचित पैसे कमवायचे आहे, असेही उत्तर मिळू शकते. त्यात गैर काहीच नाही.
मोठी बातमी : दिंडोरीचे प्रांत तब्बल 40 लाखांची लाच घेताना जाळ्यात
कारण आपण सर्वच जण शिक्षण, प्रशिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय किव्हा उद्योगधंदा पैसे कमवण्यासाठीच तर करतो, नाही का? परंतु, मला वाटते की इथेच तर खरा प्रॉब्लेम आहे. जीवनात पैसे कमवण्याचा उद्देशाने केलेले काम कधीच समाधान देऊ शकत नाही. तुम्ही जर तुमच्या रुग्णाच्या (उद्योग व्यवसायात कस्टमर, क्लायंट, ग्राहक असे म्हणतात) इच्छा, अपेक्षा, मागण्या आणि गरजा ओळखून सेवा दिली तर ती अधिक भावते. रुग्णांचे दुःख समजून घेऊन त्याच्या शारीरिक आणि भावनिक वेदना घालवल्या व त्यांच्याशी आस्थेने व्यवहार केला तर ते जीवनभर तुमचे पेशंट बनतात. मग पैसा आपोआप येतो. जेव्हा पैशाला प्राधान्य दिले जाते, तेव्हा पैसा पुढे आणि आपण त्याच्या मागे धावत सुटतो आणि ती रेस मरेपर्यंत सुरू राहते.
आरोग्यदूत निघाला गुटखा माफीया राज भाटियाचा हस्तक
डॉक्टर काही देव नाही, हे जसे सामान्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, तसेच ते प्रत्येक डॉक्टरनेही लक्षात ठेवले पाहिजे. आपल्यात देवत्व नाही, म्हणजे अमरत्वही नाही. आपणही सर्वसामान्यच आहोत, हे विसरू नये. त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात, वयाप्रमाणे आपल्या शरीरात आणि मानसिकतेत बदल होत असतात, प्रॉब्लेम होऊ शकतो याची जाण असावी. मला सर्व काही माहीत आहे, म्हणून मला काही काळजी करण्याची गरज नाही, कुठली तपासणी करण्याची गरज नाही, कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकतो ही डॉक्टरांची मानसिकता असते.
त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसले
डॉक्टर जरी असलो, तरी वेळोवेळी स्वतःची काळजी घेणे, तपासण्या करणे, काही त्रास असल्यास त्वरित उपाय करणे गरजेचे असते. दिवसभरातून स्वतःसाठी वेळ काढा. व्यायाम, विरंगुळा, आहार, झोप, औषधोपचार यावर विशेष लक्ष द्या. एखादा छंद जोपासावा, एखादा सांघिक आणि मैदानी खेळ खेळावा, ज्यामुळे तणाव कमी होईल. फॅमिली सोबत वेळ घालवा, मुलांना क्वालिटी टाइम द्या, त्यांच्यासोबत खेळा, फिरायला जा, त्यांच्याशी बोला, त्यांचे ऐका. आठवड्यातून एक पूर्ण दिवस तरी फॅमिलीला देणे गरजेचे वाटते. मित्र बनवा. व्यवसाया बाहेरील मित्र असल्यास उत्तम. डॉक्टर मित्र असले, की त्याच हॉस्पिटलच्या, पेशंटच्या, ऑपरेशनच्या गप्पा, तेच तेच रोजचे किस्से, जोक्स, आठवणी वगैरे वगैरे. त्या वर्तुळातून थोडे बाहेर या, म्हणजे इतरांच्या सोबत छान वेळ जाईल.
वणी -सापुतारा महामार्गावर अपघातात चौघे ठार
व्यवसाय आणि प्रॅक्टिस ही आयुष्यभर चालणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करतांना बदलता काळ लक्षात घ्यावा, येणारे आव्हाने आणि धोके लक्षात ठेवून प्रॅक्टिस करावी. हवेच्या बदलत्या दिशा ओळखून आपली व्यावसायिक नाव त्याप्रमाणे वळवावी. खूप जास्त रिस्क घेऊन काम करणे धोक्याचे असते, कधीतरी ते अंगलट येते, हे वय निघून गेल्यावर कळते, हेही खरंय.
समृद्धी महामार्गावर खासगी बस पेटली; २५ जणांचा मृत्यू
जगण्यासाठी पैसा लागतो हेही खरं आहे, परंतु त्याला मर्यादा असावी. पैशासाठी काम करण्याऐवजी रुग्णांच्या इच्छा, अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे उपाय करावे. स्वतःची बलस्थाने ओळखावे, तुम्ही काय बेस्ट करू शकता, किव्हा तुम्ही कशात एक्स्पर्ट आहात, त्या कामावर भर द्यावा. कारण असे काम करताना तुम्हाला तणाव जाणवणार नाही.
शहरातील आठ पोलिस ठाण्यांना लाभले नवीन प्रभारी ; राजू पाचोरकर म्हसरूळ तर न्याहदे आडगावला
तुमच्या कमकुवत बाजू काय आहेत, यावरही विचार करावा. तुमची कमजोरी तुमच्या शक्तीत कशी परिवर्तित होईल, यासाठी उपाय करावे. वैद्यकीय व्यवसायाच्या परिस्थितीचा विचार करून योग्य क्षेत्रात संधी शोधावी. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्यात खूप मेहनत घ्यावी लागेल, जिथे कॉम्पिटीशन कमी आहे त्यात शिक्षण/प्रशिक्षण घेऊन एक्स्पर्ट म्हणून व्यवसाय करावा. समाजाला एका डॉक्टरकडून काय अपेक्षित आहे, याचा विचार करून व्यवसाय केला तर, निश्चितच समाज तुम्हाला डोक्यावर घेईल, हे मी खात्रीने सांगतो…! राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा…! (समाप्त)
*