नाशिक

घरकाम करणार्‍या महिलेने 14.30 लाखांचे दागिने चोरले

मुंबई नाका पोलिसांनी काही तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

वडाळागाव : प्रतिनिधी
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 12 तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल 14 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. घरकाम करणार्‍या महिलेनेच मालकाच्या घरातून दागिने व रोख रक्कम चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. संभाजी चौक परिसरातील रहिवासी नमिता शैलेश राजहंस यांच्या घरातून 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास 14.30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान घरात काम करणारी महिला दर्शना गंगाराम गांगड (वय 20, रा. चुंचाळे, अंबड) हिच्यावर संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
पो. आयुक्त संदीप कर्णिक, पो. उपआयुक्त मोनिका राऊत, सहा. पो. आयुक्त प्रमोद वाघ आदींच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पुंडित पवार, सहा. सुधीर पाटील आदींच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत गुन्हे शोध पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख, रोहिदास सोनार, प्रदीप कडाळे, देवीदास गाढवे, पोलीस अंमलदार समीर शेख, राजेंद्र नाकोडे आदींनी ही कामगिरी पार पाडली.

Domestic worker stole jewellery worth ₹14.30 lakh.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago