नाशिक

रिंगरोड प्रकरणात शेेतकर्‍यांवर अन्याय होऊ देऊ नका

आ. सरोज आहिरेंनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

नाशिक : प्रतिनिधी
रिंगरोड विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी देवळाली मतदारसंघातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी या त्यांच्याकडील उपजीविकेचे तेवढेच साधन आहे. त्यामुळे भूसंपादन करताना शेतकर्‍यांसह बाधितांवर अन्याय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार सरोज आहिरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन चर्चेदरम्यान केली.
आमदार आहिरे म्हणाल्या, की अलीकडे सक्तीने भूसंपादन होणार असल्याच्या बातम्यांमुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून, ते दूर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. आ. आहिरे यांचे म्हणणेे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गांभीर्याने ऐकून घेत शेतकरीहिताला प्राधान्य देत सकारात्मकता दर्शवली. संबंधित शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन महापालिका आयुक्त, एमएसआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व भूसंपादन अधिकार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करून सर्व अडचणी समजून घेण्याबाबत तत्परता दाखवली. शेतकर्‍यांशी संवाद साधून, योग्य मोबदला व पर्यायी उपाययोजना यावर चर्चा करूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आ. आहिरे यांना देण्यात आले. शेतकरीकेंद्रित दृष्टिकोनातून निर्णय घेणे ही स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीची ओळख असून, त्याच धर्तीवर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा आ. आहिरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या भेटीतून रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेत संवाद व समन्वयातून तोडगा निघण्याची आशा शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे. यावेळी निवृत्ती अरिंगळ्े, विक्रम कोठुळे, विनोद देशमुख, दीपक हगवणे, सुरेश पिंगळे, योगेश रिकामे आदी उपस्थित होते.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago