संपादकीय

अधिक मासात ’अधिक’पण नको..!

अधिक मास हा मराठी वर्षातील हिंदू पंचांगातील एक विशेष महिना. यास पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केला जातो, असे धर्म सांगते. या महिन्यात जप, तप, दान,
मूर्तिपूजा, व्रत, पारायण यांना विशेष महत्त्व असते. पण या महिन्यात लग्न समारंभ, गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करणे अमान्य आहे.
या काळात धार्मिक ग्रंथ वाचनाला अतिशय महत्त्व धर्मात मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान यांनाही महत्त्व आहे.
परंपरेनुसार रीत म्हणून अधिक मासात लेक-जावई यांना वाण देऊन त्यांचा सन्मान करण्याची महत्त्वाची कौटुंबिक रीत आहे. लेक-जावई यांना घरी बोलावून त्यांचे आदरातिथ्य केले जाते. माहेरी बोलावून मिळणारा सन्मान व आदर हे प्रत्येक लेकीसाठी सन्मानाचे व भाग्याचे लक्षण आहे. पण प्रत्येक लेकीच्या नशिबात असे भाग्य कुठे? आजकाल या पद्धतीमध्ये अजून बदल केले जातात. ते कार्यक्रम अजून सुशोभित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या पारिवारिक रीती फक्त घरातच न राहता सोशल मीडियामुळे चारचौघांत प्रदर्शित होतात. काही ठिकाणी अधिक मासाचे विशेष इव्हेंटपण ठेवले जातात. असे इव्हेंट नक्कीच देखाव्यासाठी असतात. कारण इव्हेंट करणे हे परंपरेत गरजेचे नाही. बघितले तर याचे काही दुष्परिणामही होतात. होते काय तर या सर्व दिखाव्याचे परिणाम समाजातील गरीब कुटुंबातील, कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींना किंवा अनाथ मुलींनापण याचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यांचा समाजात कुठेही विचार केला जात नाही. या काळात सासरी मुलींना स्वतः अपराधी वाटते. त्यांची भावनिक घुसमट होते. अशी भावना अव्यक्त असते. काही ठिकाणी तर अधिक मासाची नको ती मागणी जावयांकडून केली जाते. जी मुलीच्या माहेरच्या लोकांना अमान्य असते किंवा खर्चिक वाटते. परिस्थिती असेल त्यांनी अधिक मास नक्कीच करावा. धार्मिक विधीप्रमाणे साजरा करावा. कारण आपली परंपरा जपणे ही आपली संस्कृती आहे. तिचा आपण आदर करायलाच हवा. पण त्याचा अतिरेक करून चारचौघांत प्रदर्शन मांडून अधिक नसावा. समाजातील वंचित घटकांचाही विचार करावा. त्याहीपेक्षा जमल्यास वंचितांना ही सन्मान दिला तर अधिक मासातील दानधर्म हा पुण्यकाळ मानला आहे. या मासाचा खरा उद्देश लक्षात काय तर नातेसंबंधांमध्ये अधिक घट्ट प्रेम निर्माण व्हावे. कुटुंबातून आपुलकी, जिव्हाळा निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आचार-विचारांनी ही परंपरा जपावी. तिचा आदर व्हावा व कुटुंबात औदार्य वाढावे, पण अधिक मास हा कोणताही अधिक अतिरेक न करता त्याचा अधिकपण नको. म्हणून असेही लक्षात घेऊन समाजाला गालबोट लागणार नाही, याची काळजी प्रत्येक कुटुंबाने घ्यावी.

Don’t say ‘more’ in more months..!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago