संपादकीय

जन्मशताब्दी वर्षानिमित्त कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांसह आठवणींचा जागर

मराठी साहित्यातील कष्टकरी, कामगार आणि उपेक्षित वर्गाचे प्रगल्भ प्रतिनिधित्व करणारे महान कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या (15 ऑक्टोबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2026) सुरू आहे. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926 रोजी झाला होता. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने नाशिक शहरात वर्षभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक नगरीचा सुर्वे यांच्याशी विशेष ऋणानुबंध होता. जन्मशताब्दीचे औचित्य साधून कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने भव्य कविसंमेलनांचे व सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. गोदाघाटावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेतदेखील नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर करण्यात आला. एकाच आठवड्यात सलग दोन ठिकाणी अशा प्रकारे नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे सुर्वे मास्तर अर्थात ख्यातकीर्त कवी नारायण सुर्वे यांच्या कविता श्रमिकांच्या व्यथा मांडतात. या व्यथा सर्वकालीन आहेत. त्यामुळे या कविता नेहमीच समकालीन वाटतात. या कवितांमधून त्या काळातील कोलाहल आजच्या काळातही जाणवतो, अशी मांडणी करत भाकरीचा चंद्र या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून आज वसंत व्याख्यानमालेत सुर्वे यांच्या कवितांचा जागर करण्यात आला. गिरणी कामगारांच्या व्यथाच नव्हे, तर अवघ्या कामगार विश्वाचेच यथार्थ चित्रण अधोरेखित करण्यात आले. नाशिक वसंत व्याख्यानमालेत कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाकरीचा चंद्र हा विशेष कार्यक्रम झाला. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याखानांंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाचे संहितालेखन दत्ता पाटील यांनी, तर दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. राजेंद्र उगले, अरुण इंगळे, राम वाणी, विक्रम नन्नावरे व श्रद्धा देशपांडे यांनी हा कार्यक्रम सादर केला. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते पद्मश्री नारायण सुर्वे आणि स्व. माधवराव लिमये यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले.
सुर्वे कुलातील शंभर कवींचा सन्मान :
कविवर्य नारायण सुर्वे मार्क्सवादी, डाव्या, आंबेडकर आणि प्रगतिशील परंपरेचे पाईक होते, असे प्रतिपादन साहित्यिक बी. जी. वाघ यांनी केले. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त सुर्वे कुलातील शंभर कवींचा सन्मान करण्यात आला. नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय आणि प्रगतिशील लेखक संघातर्फे कविसंमेलन झाले. त्याचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. वाचनालयाच्या उपाध्यक्षा डॉ. मनीषा जगताप, कादंबरीकार राकेश वानखेडे उपस्थित होते. वाघ म्हणाले की, सुर्वेंच्या कवितेतून विद्रोह, भारतीय समाजव्यवस्थेचे चित्र येते. ते खर्‍या अर्थाने श्रम व्यवस्थेतले आणि श्रमजीवी घटकांचे कवी होते असे म्हणता येईल. यावेळी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंभर कवींचा सन्मान करून नवसाहित्यिकांमध्ये प्रबोधनपर साहित्यदृष्टी जागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे. संमेलन आणि सन्मानामागील भूमिका राकेश वानखेडे यांनी मांडली. चार सत्रांमध्ये कविसंमेलन आणि सन्मान सोहळा झाला. निमंत्रित सर्व कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव :
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आणि हिंदवी स्वराज्यासाठीचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने नवीन नाशिकमधील शौर्य फाउंडेशन मित्रमंडळातर्फे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना तरुणांसह नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश चौक परिसरात आयोजित कार्यक्रमात 7 ते 17 वयोगटातील मुला-मुलींसाठी नृत्य, वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्पर्धांत सहभागी स्पर्धकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि विचार प्रभावीपणे सादर केले. स्पर्धांतील प्रथम तीन क्रमांक मिळविणार्‍या स्पर्धकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान हभप सोपान महाराज कनेरकर यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर व्याख्यान झाले.
सुरांची पहल मैफल रंगली :
गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात झालेला ‘पहल’ हा मैफलीचा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. सुरांच्या साथीने आणि निसर्गाच्या हाकेसोबत रंगलेला हा कार्यक्रम नाशिककरांच्या मनात खास घर करून गेला. संगीत, पक्ष्यांचे आवाज, निसर्गाच्या गोष्टी आणि सुंदर सादरीकरण यामुळे सभागृह एका वेगळ्याच विश्वात हरवून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजय विसपुते आणि मृण्मयी फाटक यांच्या सुरेल आवाजाने सादर केलेल्या गीताने वातावरण भारावून गेले. मराठी व हिंदी गाण्यांची सुंदर निवड रसिकांच्या मनाला भिडली. धवल जोशी यांच्या बासरीचे सूर, रोहन वनगे यांची ढोलकी आणि निनाद सोलापूरकर यांचा कीबोर्ड यामुळे प्रत्येक गाणे अधिक खुलत गेले. ‘पहल’ची खास गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम फक्त गाण्यांपुरता मर्यादित राहत नाही. पक्ष्यांची भाषा, त्यांचं जगणं आणि माणसाचं निसर्गाशी असलेले नाते डॉ. कपिल जोशी यांनी सोप्या आणि सुंदर शब्दांत मांडले.
अनंत कुबल एकांकिका स्पर्धा :
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिरात उत्साहात झाल्या. पहिल्या दिवशी समाजाच्या दृष्टिकोनावर प्रभावी भाष्य करणार्‍या एकांकिका सादर झाल्या. परीक्षक अभिजित झुंजारराव, आशुतोष वाघमारे व पल्लवी पटवर्धन होते. मुंबईच्या अक्षररेषा मित्रमंडळाच्या चित्ता एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात वसतिगृहातून पळून घराकडे निघालेल्या शालेय विद्यार्थ्यांची कथा मांडण्यात आली
आहे.
महिला कविसंमेलन रंगले :
गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचाच्या वतीने काळजातली आई हे चौथे महिला कविसंमेलन झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार अध्यक्षस्थानी होते. हुतात्मा स्मारकाचे व्यवस्थापक सुनील साळवे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी वाघ म्हणाले की, साहित्य हा प्रत्येकाच्या चिंतनाचा विषय असायला हवा. मानवी भावभावना व्यक्त करण्यासाठी कवितेची निर्मिती केली जाते. मात्र, त्यात जगण्याचे तत्त्वज्ञानच मांडलेले असते. सरचिटणीस भारती निकम, शहराध्यक्ष आशा गोवर्धने, सटाणा तालुकाध्यक्ष पुष्पा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

Reminiscing on the centenary of poet Narayan Surve’s poems

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago