संपादकीय

हरभरा उत्पादनवाढीसाठी प्रभावी उपाय : शेंडा खुडणे

चांगली थंडी पडल्यामुळे हरभरा पीकदेखील जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. पण हरभरा पीक फक्त जोमदार वाढ होऊन उत्पादन देत नाही. बर्‍याच वेळा पीक फक्त उंच वाढतं अशा वेळी फांद्या कमी असतात आणि घाट्यांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट होते. अशा वेळी उंच वाढणारी वाढ थांबवून फांद्यांची संख्या वाढविण्यासाठी शेंडा खूडणे ही अत्यंत सोपी आणि फायदेशीर कृती ठरते. पिकाच्या शेंडा खुडणीचा फायदा घेण्यासाठी त्याची योग्य वेळ साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हरभरा पिकाची शेंडा खुडणी पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांच्या दरम्यान करावी. यावेळी पीक साधारणपणे चार ते पाच फांद्यांच्या अवस्थेत असावे. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शेंडा खुडणी. ही पिकाला फुले येण्यापूर्वीच करणे गरजेचे असते. जर हरभरा पिकाला फुले येण्यास सुरुवात झाली असेल, तर शेंडा खुडणी करणे टाळावे. चांगला फायदा मिळावा यासाठी योग्यवेळी शेंडा खूडणे आवश्यक असते शेंडा खुडण्याची पद्धत सोपी असून, कमी खर्चिक आहे. शेतकर्‍यांनी कोवळ्या अवस्थेतील झाडाच्या वरचा फक्त दोन ते तीन सेंटिमीटरचा शेंडा काढून टाकावा. हे काम सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करणे अधिक योग्य ठरते. पावसाळी किंवा अतिओलसर वातावरणात शेंडा खुडणे टाळावे. कारण अशा परिस्थितीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच अशक्त, रोगट किंवा किडीने बाधित झाडांवर शेंडा खुडणे करू नये. यामुळे अधिक वाढ खुंटते.
शेंडा खुडण्याचे फायदे अनेक आहेत. या प्रक्रियेमुळे हरभरा पिकामध्ये बाजूच्या फांद्यांची संख्या वाढते, ज्यामुळे अधिक फुले येतात. फुलांची संख्या वाढल्यामुळे घाट्यांची संख्या वाढते आणि परिणामी दाण्यांचे उत्पादन जास्त मिळते. पिकाची उंची नियंत्रित राहिल्याने झाड आडवे पसरते आणि सूर्यप्रकाशाचा योग्य वापर होतो संपूर्ण झाडाला योग्य प्रमाणात सुर्य प्रकाश मिळतो. अन्नद्रव्यांचा वापर खोडाच्या वाढीऐवजी फुले व घाट्यांच्या निर्मितीसाठी होतो. योग्य व्यवस्थापनासह शेंडा खुडल्यास हरभरा उत्पादनात 15 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
उंच वाढणारे, देशी आणि मध्यम कालावधीचे वाण जसे की, विजय, विराट, दिग्विजय, जाकी-9218, फुले विक्रम या वाणांमध्ये शेंडा खुडणे अधिक फायदेशीर ठरते. झाडांची वाढ पसरट होते. मात्र, बुटके किंवा कमी उंचीचे सुधारित वाण घेत असताना शेंडा खुडण्याची आवश्यकता नसते. शेंडा खुडताना काही महत्त्वाच्या काळज्या घेणे आवश्यक आहे. पिकावर दुष्काळ, अतिथंडी, कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव असल्यास शेंडा खुडणे टाळावे. शेंडा खुडणीनंतर पिकाला योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे महत्त्वाचे असते. आवश्यक असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे की झिंक व बोरॉन यांची फवारणी केल्यास बाजूच्या फांद्यांची वाढ अधिक जोमदार होते. तसेच शेंडा खुडणीनंतर 10-15 दिवसांत आंतरमशागत केल्यास तण नियंत्रणास मदत होते. शेंडा खुडणे हे एक स्वतंत्र तंत्र नसून, ते इतर पीकव्यवस्थापन पद्धतींसोबत राबवणे आवश्यक आहे. योग्य अंतरावर पेरणी, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर सिंचन आणि कीड-रोग नियंत्रण या सर्व गोष्टी एकत्रितपणे केल्यास शेंडा खुडण्याचा पूर्ण फायदा मिळतो.

 – सोनाली कदम
                                                                                 सहाय्यक कृषी अधिकारी

Effective solution to increase gram production: Top picking

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago