घोडमनी येथे दुर्घटना; सरकारी अनास्थेवर संताप
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील दावलेश्वर-जवळील घोडमनी येथे लाकडी साकव ओलांडताना पाय घसरून नदीत पडलेल्या 62 वर्षीय वृद्धाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली. दिवसभर शोधमोहीम राबवूनही त्यांचा शोध लागलेला नव्हता.
बेपत्ता झालेल्या वृद्धाचे नाव सोमा चिमणा चौधरी (वय 62, रा. घोडमनी) असे आहे. दशक्रिया विधीसाठी ते रविवारी रात्री गावात आले होते. सोमवारी सकाळी दुखवटा व्यक्त करण्यासाठी नदीपलीकडील गावात जात असताना नदीवरील तात्पुरत्या लाकडी साकवावर त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात कोसळले. घटनेचे प्रत्यक्षदर्शी सांगतात की, चौधरी यांनी सुरुवातीला पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाहाच्या वेगामुळे ते पुन्हा पाण्यात ओढले गेले. त्यानंतर जवळील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्याजवळ ते अडकल्यानंतर वेगवान प्रवाहाने त्यांना पुढे
फेकले आणि ते दमणगंगा नदीच्या पात्रात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार गणेश जाधव, हरसूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. घोडमनी येथील नदीवर उभारण्यात आलेला लोखंडी पूल यावर्षी 8 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेला. पूल वाहून गेल्यानंतर उरलेल्या सिमेंटच्या खांबांवर लाकडे टाकून ग्रामस्थांनी तात्पुरता साकव तयार केला असून, जीव धोक्यात घालून त्याचाच वापर सुरू आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही येथील पूल वाहून गेला होता. वारंवार पूल वाहून जाण्याच्या घटनांमुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपयांची तरतूद असूनही ग्रामीण भागात आजही नागरिकांना मध्ययुगीन पद्धतीच्या लाकडी साकवावरून प्रवास करावा लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
निकृष्ट दर्जाचे काम करणार्या संबंधित अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जिल्ह्यातील धोकादायक साकवांचा तातडीने शोध घेऊन तेथे सुरक्षित पूल उभारले नाहीत तर किसान सभा तीव्र आंदोलन उभारेल.
– कॉ. इरफान शेख, जिल्हा सचिव, किसान सभा
Elderly man swept away while crossing the river.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik