नाशिक

कार अपघातात अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार

रस्तेकामाचा आणखी एक बळी; वासळीजवळील घटना

सिडको : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्तेकामांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. अपघातांच्या घटनाही समोर येत आहेत. त्र्यंबकेश्वर रोडवरील वासळी फाट्याजवळ चारचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. 6 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास महिंद्रा लॉजिस्टिकसमोर ही घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात फेटलची नोंद करण्यात आली आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल किसन ओझा (वय 22, रा. जळगाव) हा संदीप युनिव्हर्सिटीमध्ये संगणक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. राहुल हा दोन मित्रांसह चारचाकीने त्र्यंबकेश्वर रोडवरून जात होता. वासळी फाट्याच्या अलीकडे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला होता. एकेरी रस्त्यावरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू असताना राहुलच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर चारचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली.
या अपघाताची तीव्रता अधिक असल्याने राहुलसह त्याच्या दोन मित्रांना गंभीर दुखापत झाली. राहुलच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे सांगण्यात येते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याचा भाऊ प्रशांत पाठक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी राहुलसह जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना राहुलचा मृत्यू झाला.
रस्तेकामांच्या ठिकाणी वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना, दिशादर्शक फलक आणि सुरक्षित मार्गाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावरील कामे आणि वाहतुकीतील बदल वाहनचालकांच्या लक्षात येण्यासाठी पुरेशी प्रकाशयोजना व सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या अपघाताची नोंद सातपूर पोलिसांनी केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Engineering student killed in car accident

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

8 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

8 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

8 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

8 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

8 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

8 hours ago